Agriculture news in marathi Increase in carrot, peas, pail rate | Agrowon

गाजर, मटार, पावट्याच्या दरात वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 मार्च 2020

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली. कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारावर विपरित परिणामाची शक्यता होती. मात्र, आवक आणि बाजारभाव स्थिर होते. तर ग्राहक खरेदी करून तातडीने बाजार आवाराबाहेर पडत असल्याचे चित्र असल्याने बाजारपेठ सुरळीत होती. दरम्यान, गाजर, मटार, पावट्याचे दर तुलनेने वाढल्याचे पहायला मिळाले. 

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली. कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारावर विपरित परिणामाची शक्यता होती. मात्र, आवक आणि बाजारभाव स्थिर होते. तर ग्राहक खरेदी करून तातडीने बाजार आवाराबाहेर पडत असल्याचे चित्र असल्याने बाजारपेठ सुरळीत होती. दरम्यान, गाजर, मटार, पावट्याचे दर तुलनेने वाढल्याचे पहायला मिळाले. 

परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ५ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ५ टेम्पो, राजस्थानातून ६ ट्रक गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी सुमारे ५ ट्रक, राजस्थानातून मटार सुमारे ६ ट्रक, मध्य प्रदेशातून लसणाची सुमारे ६ हजार गोणी, कर्नाटकमधून 
तोतापुरी कैरी ४ ट्रक, गुजरात, इंदौर आणि स्थानिक बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली.

 स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे एक हजार पोती, टोमॅटो सुमारे ६ हजार क्रेट, भेंडी, काकडी, फ्लॉवर, सिमली मिरची आणि तांबडा भोपळा, कोबी प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, गवार ८ टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, शेवगा ४ टेम्पो, तर कांद्याची सुमारे २०० ट्रक आवक झाली. तर पारनेर येथून मटारची सुमारे ३ टेम्पो, पावटा ५ टेम्पो, चिंचेची १० गोणी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव

कांदा : १५०-१७०, बटाटा : १५०-२००, लसूण : ४००-७५०, आले : सातारी ३५०-४००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान - सुरती ४००-५००, टोमॅटो : ६०-८०, दोडका : १००-२००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ३०-६०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी १००-२००, पांढरी: ८०-१००, पापडी : १००-१२०, पडवळ : १४०-१५०, फ्लॉवर : ६०-८०, कोबी : ३०-६०, वांगी : १००-२५०, डिंगरी: १५०-२००, नवलकोल: ७०-८०, ढोबळी मिरची : २००-३००, तोंडली : कळी १००-१५०, जाड : ७०-८०, शेवगा : १५०-२००, गाजर : १८०-२२०, वालवर : १४०-१५०, बीट : ३०-६०, घेवडा : १५०-१८०, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : २००-२५०, पावटा : ३००, भुईमूग शेंग : बेळगाव -५००, गुजरात -७००, मटार : स्थानिक - ४००-४२०,  परराज्य ३२०-३८०, तांबडा भोपळा : ८०-१४०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 

पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. १५) कोथिंबिरीची सुमारे सव्वादोन लाख, मेथीची सुमारे एक लाख जुड्यांची आवक झाली होती. 

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-८००, मेथी : २००-२५०, शेपू : ४००-८००, कांदापात : ५०० -८००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ५००-७००, मुळे : ४००- ६००, राजगिरा : ४००-५००, चुका : ५००-८००, चवळी : ४००-५००, पालक : ४००-५००. हरभरा गड्डी -३००-५००. 

फळबाजार 

रविवारी (ता. १५) येथील बाजारात मोसंबी ३० टन, संत्री सुमारे ७० टन, डाळिंब १०० टन, पपई १५ टेम्पो, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, कलिंगड ४० टेम्पो, खरबूज ३० टेम्पो, द्राक्षे सुमारे ४० टन, पेरू २०० किलो, चिक्कू २ हजार डाग, तर स्ट्रॉबेरीची सुमारे ५ टन आवक झाली. 
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १५०-२५०, मोसंबी : (३ डझन) : ८०-१००, (४ डझन ) : २०-८०, संत्रा : (३ डझन) : ८०-२५०, (४ डझन ) : ३०-१२०, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : ५०-१५०, गणेश : २०-४०, आरक्ता ३०-७०. कलिंगड : ५-१०, खरबुज : ५-१५, पपई : ५-२०, सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) १०००-१३००, किन्नोर -(२५-३०) - २०००-२५००, सिमला (२५) -१६००-२०००,  स्‍ट्रॉबेरी (२ किलो) - ६०-१२०, द्राक्षे - सोनका (१५ किलो) - ६००-१०००, जम्बो - ८००-१३००, ताश ए गणेश - ५००-७००, माणिक चमण - ४५०-६००. 

फूलबाजार 

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१०, गुलछडी : २०-३०, बिजली- ५-१०, कापरी : ५-१०, शेवंती : ४०-५०, मोगरा - २००-३००, अ‍ॅस्टर : ५-६, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ५-१०, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ३०-५०, लिली बंडल : ३-५, जर्बेरा : ५-१५, कार्नेशियन : ३०-६०.

मटण-मासळी 

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सागरी किनारपट्टीवरील मासळी बाजारातील गर्दी रोखण्यासाठी मच्छीमारांनी मासेमारी तुलनेने कमी केली. त्यामुळे बाजारातील मासळीची आवक तुलनेने घटली आहे. तर मागणीही घटल्याने मासळीचे गेल्या आठवड्यातील तुलनेतील दर टिकून आहेत. दरम्यान, हॉटेल व्यावसायिकांकडून चिकन, अंडी, मासळीची मागणी मोठ्या स्वरूपात घटली आहे. चिकन व अंड्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर चिकनचा ग्राहक मटणाकडे वळल्याने मटणाचे वाढलेले दर स्थिर आहेत.   

गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १५) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ६ टन, खाडीची सुमारे १५० किलो, तर नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.  

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)

पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे १५००, मध्यम : ९००-१०००, लहान ७००-७५०, भिला :  ६५०-७००, हलवा : ६००, सुरमई : ६५०-७००, रावस : लहान ६००-६५०,  मोठा : ८००-९००, घोळ : ६५०, भिंग : ४००, करली : २८०-३२०, करंदी : ४००, पाला : लहान ७०० मोठे : १२००, वाम :  ८००-१०००, ओले बोंबील : २४०-२८०.
कोळंबी ः लहान ३६०, मोठे : ४८०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : २८०-३२०, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २०० खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ५५०. 

खाडीची मासळी : सौंदाळे : ३००, खापी : ३००, नगली : ५५०, तांबोशी : ४८०, पालू : २४०, लेपा : २४०-२८०, शेवटे : २८०, बांगडा : २८०, पेडवी : १००, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : १६०, खुबे : १६०, तारली : १८०-२००. 

नदीची मासळी : रहू : १४०-१६०, कतला : १६०, मरळ : ४८०, शिवडा : २८०, खवली : २४०, आम्ळी : १६०, खेकडे : २०० वाम : ५५०. 

चिकन 

चिकन : चिकन : ९०, लेगपीस : ११०, जिवंत कोंबडी : ७०, बोनलेस : २००. अंडी : गावरान : शेकडा : ६५० डझन : ९० प्रति नग : ७.५०. इंग्लिश : शेकडा : ३२५ डझन : ४८ प्रतिनग : ४. 
मटण : बोकडाचे : ६००, बोल्हाईचे : ६०० खिमा : ६००, कलेजी : ६४०.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर ताज्या घडामोडी
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...