Agriculture news in marathi Increase consumption of fruits and vegetables in the diet: Dr. Sharma | Agrowon

आहारात फळे, भाज्यांचा वापर वाढवा : डॉ. शर्मा

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

सोलापूर :आपल्या आहारात फळांसह भाज्यांचा वापर वाढवण्याची आवश्‍यकता आहे,'' असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. ज्योत्सना शर्मा यांनी व्यक्त केले.

सोलापूर : "कोरोना महामारीचे संकट सर्वांनाच त्रासदायक ठरले आहे. त्याला दूर ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती उत्तम असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आपल्या आहारात फळांसह भाज्यांचा वापर वाढवण्याची आवश्‍यकता आहे,'' असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. ज्योत्सना शर्मा यांनी व्यक्त केले. 

खेड येथील कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि महिला शेतकऱ्यांसाठी पोषण आहार क्षमता वृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शबरी कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे उपस्थित होते. 

डॉ. शर्मा म्हणाल्या, "डाळिंबाचाही मोठा उपयोग आहारामध्ये केला जावा. सोलापूर लाल हे डाळिंबाचे वाण त्यासाठी उपयुक्त आहे. डाळिंबाच्या दाण्यातील अलीगाटॅनीन घटक चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करतो. त्याशिवाय लवंगही उपयुक्त आहे. टोमॅटो व बीटरूट, हिरव्या पालेभाज्या, खजूर यांचा वापर आपल्या आहारामध्ये प्राधान्याने करायला हवा. त्याशिवाय बदामाचा उपयोग ह्रदयासाठी, अक्रोडचा उपयोग मेंदुसाठी, काजूचा उपयोग किडणीसाठी होतो. '' 

महिलांचा गौरव, बियाणे किट वाटप

उत्कृष्ठ पोषण थाळी स्पर्धेच्या प्रमाणपत्रांचे वितरण झाले. अंगणवाडी मदतनीस महानंदा टोणपे यांना प्रथम क्रमांकाचे व अंगणवाडी सेविका सुनिता बारसकर यांना द्बितीय क्रमांकाचे पदक देऊन गौरवण्यात आले. परसबागेमध्ये लागवडीसाठी रोपांचे वाटप करण्यात आले.


इतर बातम्या
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...