agriculture news in marathi Increase in crop loan rates of sugarcane and pomegranate in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात ऊस, डाळिंबाच्या पीककर्ज दरात वाढ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जानेवारी 2021

पुणे ः पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज दरात वाढ करण्याचे ठरविले आहे. यंदा दोन पिकांच्या पीक कर्ज दरात वाढ केली आहे.

पुणे ः पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्ज दरात वाढ करण्याचे ठरविले आहे. यंदा दोन पिकांच्या पीक कर्ज दरात वाढ केली आहे. यामध्ये आडसाली ऊस आणि डाळिंब पिकांसाठी सर्वाधिक म्हणजे सहा हजार रूपयांपर्यंत वाढ केली आहे. 

दरवर्षी पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने उत्पादन खर्चाचे निश्चित केलेले दर यावर प्रगतिशील शेतकरी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये सोमवारी (ता.११) चर्चा झाली. त्यामध्ये ही कर्ज दरवाढ निश्चित केली.

याशिवाय खेळत्या भांडवलामध्ये शेळी, मेंढीच्या संगोपनाच्या कर्जदरातही ५ हजार रुपयांना वाढ केली आहे. पूर्वी त्यासाठी १५ हजार रुपये दिले जात होते. आता त्यामध्ये वाढ करून ते २० हजार रुपये देण्यात येतील. येत्या २०२१-२२ च्या आर्थिक वर्षामध्ये ठरविलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे.  

जिल्हा बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात पीक कर्जवाटप केले जाते. या बॅंकेचे जिल्ह्यात जवळपास २७५ शाखांमधून शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येते. जिल्ह्यात बँकेचे खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० हून अधिक आहे. त्यापैकी जवळपास दोन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने, तर तीन लाखांच्या पुढे सहा टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते.

उसासाठी ६००० रुपये वाढ 

चालू वर्षी शेती कर्जातील आडसाली उसामध्ये सहा हजार रुपयांना वाढ करून एक लाख २६ हजार रुपये कर्जदर निश्चित केले. तर, डाळिंबामध्ये पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. आता एक लाख ४५ हजार रुपये पीककर्ज दर निश्चित केले आहेत. उर्वरित कोणत्याही पिकांच्या कर्जदरात वाढ केलेली नाही.  


इतर ताज्या घडामोडी
नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना...नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू...
येवल्यात ४६ हजार ग्राहकांकडे २६६ कोटी...येवला, जि. नाशिक : तालुक्यातील कृषिपंप धारकांची...
हवामान बदलाचा आंब्यावरील परिणाम...रत्नागिरी ः वातावरणातील चढ-उताराचे आंबा पिकावर...
परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार...परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी...
आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले :...नगर : राज्य विधानसभेत मी १९८० साली ५६ आमदारांचा...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या...नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून...
पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष... कुरळप, जि. सांगली :  सहकार क्षेत्रातील...
निळेली पशुधन संशोधन केंद्रास वंश...सिंधुदुर्गनगरी ः कोकण कन्याळ या शेळी जातीच्या...
सिंधुदुर्गमध्ये बांधले साडेपाच हजार...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य...
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या...अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत...
भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म...भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक...
नक्षत्रांचे गणित चुकू लागलेगावातील वयोवृद्ध माणसे हाताच्या बोटांवर गणिते करत...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरजजागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन...
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी विधवांचा...यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार...नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार...
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः...नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास...
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणीजळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये...