खानदेशात तूर लागवडीत होणार वाढ

खानदेशात तूर लागवडीत होणार वाढ
खानदेशात तूर लागवडीत होणार वाढ

जळगाव : खानदेशात या खरिपात तूर लागवड सुमारे ७०० ते एक हजार हेक्‍टरने वाढण्याची शक्‍यता आहे. बागायती तूर लागवडीची तयारी रावेर, मुक्ताईनगर भागात अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. 

तुरीचे दर मागील हंगामात स्थिर राहिले. कमाल ५३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर अनेक शेतकऱ्यांना मिळाले.  शासकीय केंद्रात विक्री करण्याची वेळ फारशी शेतकऱ्यांवर आली नाही. फक्त सुरवातीला दर दबावात होते. त्या वेळेस अनेक शेतकऱ्यांनी तूर विक्री टाळली. नंतर तूर दर हमीभावांपुढे म्हणजेच ५७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. 

कमी पावसातही काळ्या कसदार जमिनीत अनेक शेतकऱ्यांना प्रतिएकर तीन ते साडेतीन क्विंटल उत्पादन आले. सिंचनाची सुविधा असलेल्या रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, पाचोरा भागातील शेतकऱ्यांनी एकरी नऊ क्विंटलपर्यंतचे उत्पादन घेतले. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातील अनेक केळी उत्पादक तूर लागवडीस पसंती देतात. ठिबकवर लागवड केली जाते.

हलक्‍या, मध्यम प्रकारच्या जमिनीत कोरडवाहू तुरीचे उत्पादन बोदवड, जामनेर, पाचोरा, जळगाव, चाळीसगाव भागात घेतले जाते. मागील हंगामात सुमारे १८०० हेक्‍टरवर जळगाव जिल्ह्यात, तर धुळे-नंदुरबारात सुमारे ८०० हेक्‍टरवर लागवड झाली होती. २०१७ मध्ये एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती.

या हंगामात जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच हजार, तर धुळे व नंदुरबारात सुमारे एक हजार हेक्‍टरवर तूर लागवड होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करायला सुरवात केली आहे. परंतु पाऊस लांबणीवर पडेल, असे अंदाज विविध हवामान संस्थांनी दिले. परिणामी पेरणीदेखील उशिरा होईल, अशी शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com