Agriculture news in Marathi Increase in discharge from Yeldari, Siddheshwar dam | Page 2 ||| Agrowon

येलदरी, सिद्धेश्वर धरणातून विसर्गात वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

येलदरी धरणाचे सर्व दहा आणि सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडून पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. विसर्गात वाढ होऊ शकते त्यामुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पाचे धरण शंभर टक्के भरले आहे.

परभणी ः पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्यामुळे येलदरी आणि सिद्धेश्वर धरणे शंभर टक्के भरली आहेत. सोमवारी (ता. १७) सकाळ पासून येलदरी धरणाचे सर्व दहा आणि सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडून पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. विसर्गात वाढ होऊ शकते त्यामुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पाचे धरण शंभर टक्के भरले आहे.

सोमवारी (ता. १७) सकाळी येलदरी धरणामध्ये एकूण ९३४.४४० एमएमक्युब पाणीसाठा होता. त्यापैकी ८०९.७७० एमएमक्युब (१०० टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. आजवरच्या पावसाळ्यात १ जून पासून येलदरी धरणाच्या ठिकाणी ५५९ मिमी पाऊस झाला.गतवर्षी यावेळी ४१३ मिमी पाऊस झाला होता. यंदाच्या एक जून पासून येलदरी धरणात एकूण ४१८.०१८ एमएमक्युब पाण्याची आवक झाली आहे.

गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३२.३२० एमएमक्युब पाण्याची आवक झाली. आजवर २.२७५ एमकेडब्लूएच एवढी वीज निर्मिती झाली आहे. रविवारी (ता. १६) रात्री धरणाचे सव्वा दहा वाजता ६ दरवाजे अर्धामीटरने उघडून १२६५९ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु पाण्याची आवक वाढल्यामुळे रविवारी (ता. १७) सकाळी साडे आठ वाजता सर्व दहा दरवाजे उघडून २९४८० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मासोळी प्रकल्पामध्ये ७२ टक्के उपयुक्त साठा
परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये ८४.६७ टक्के, मुद्दगल बंधाऱ्यामध्ये ७३.७७ टक्के, मुळी बंधाऱ्यात ९.४४ टक्के, डिग्रस बंधाऱ्यामध्ये ६८.५५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयात १०० टक्के तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये ७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...