Agriculture news in marathi, Increase efforts for water literacy among farmers: Ingole | Agrowon

शेतकऱ्यांमध्ये जल साक्षरतेसाठी प्रयत्न वाढवा : इंगोले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

अंबाजोगाई जि. बीड : ‘‘विद्यापीठातील संशोधन कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रचार व प्रसार करण्यावर भर देण्याची आवश्‍यकता आहे. दुष्काळ परिस्थितीतील ताण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी ‘रुंद सरी वरंबा’ तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. शेतकऱ्यांमध्ये जल साक्षरतेसाठी प्रयत्न वाढवावा,’’ सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांनी दिला.

अंबाजोगाई जि. बीड : ‘‘विद्यापीठातील संशोधन कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रचार व प्रसार करण्यावर भर देण्याची आवश्‍यकता आहे. दुष्काळ परिस्थितीतील ताण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी ‘रुंद सरी वरंबा’ तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. शेतकऱ्यांमध्ये जल साक्षरतेसाठी प्रयत्न वाढवावा,’’ सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांनी दिला.

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक बुधवारी (ता. ४) झाली. अध्यक्षस्थानी प्रकल्पप्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय अंबाजोगाईचे प्राचार्य डॉ. के. व्ही. देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सौरभ शर्मा उपस्थित होते. 

डॉ. शर्मा म्हणाले, ‘‘केव्हीकेचा कृती आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांच्या आणि शेतकऱ्यांच्या सूचना व अभिप्राय घेण्यासाठी वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक झाली. सर्वांच्या सूचना कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची दिशा व दशा निश्‍चित करण्यासाठी उपयोगी असतात.’’

निकम म्हणाले, ‘‘केंद्राच्या आहार सल्ला केंद्र व शेतकरी समुपदेशन कक्षाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. जिवाणू खते, ट्रायको कार्ड यांसारख्या निविष्ठांचे उत्पादन करून कृषी विभागासह शेतकऱ्यांना पुरवठा करावा. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात संधी आहे. बांबू शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.’’ 

विस्तार कृषिविद्यावेत्ता अरुण गुट्टे म्हणाले, ‘‘रब्बी हंगामात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव ज्वारीवर होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी मास-ट्रॅपिंग व रासायनिक फवारणी पद्धतीचा वापर करावा.’’ 

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘भूगर्भातील जलसाठा मर्यादित असून, तो वाढविण्यासाठी जलसंधारण आवश्‍यक आहे. अनेक ठिकाणी होत असलेले वाळवंटीकरण थांबविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.’’

राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांनी जल व्यवस्थापनासाठी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली. कृषी विस्तारतज्ज्ञ सुहास पंके यांनी सूत्रसंचालन केले. कृषी अभियंता प्रमोद रेणापूरकर यांनी आभार मानले.
 

इतर बातम्या
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...