agriculture news in marathi, Increase the engagement with farmers says Agriculture Commissioner | Page 3 ||| Agrowon

शेतकऱ्यांशी 'अटॅचमेंट' वाढवा : कृषी आयुक्‍त
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

नागपूर : कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शिवारभेटी कमी झाल्या आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांशी थेट संवाद होत नसल्याने ही दरी वाढती राहिली आणि कृषी क्षेत्रासमोर नवनवीन आव्हाने उभी झाली. त्यावर पर्याय म्हणून कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कॅबिनबाहेर पडत शिवारभेटींना प्राधान्य दिले पाहिजे, असा सल्ला कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिला.

नागपूर : कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शिवारभेटी कमी झाल्या आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांशी थेट संवाद होत नसल्याने ही दरी वाढती राहिली आणि कृषी क्षेत्रासमोर नवनवीन आव्हाने उभी झाली. त्यावर पर्याय म्हणून कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कॅबिनबाहेर पडत शिवारभेटींना प्राधान्य दिले पाहिजे, असा सल्ला कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिला.

वनामती येथे सोमवारी (ता.८) आयुक्‍त सिंग यांनी नागपूर व अमरावती विभागाचा आढावा घेतला. या सर्व तालुक्‍यांतील जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी बैठकीला उपस्थित होते. शेतीसंदर्भातील समस्या जाणून घेण्याकरिता शिवारभेटीशिवाय पर्याय नाही. परंतु नजीकच्या काळात शेतकरी आणि कृषी कर्मचाऱ्यांमधील संवाद कमी झाला.

त्यातूनच अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. शेतकऱ्यांशी अटॅचमेंट असेल तर त्यांच्याशी निगडित समस्या जाणता येतील आणि त्याचे वेळीच निदान करता येणे शक्‍य होणार आहे. विदर्भात अशाप्रकारच्या उपक्रमाची गरज असून कर्मचाऱ्यांनी शेतशिवाराला भेटीसाठी प्राधान्य द्यावे, असा सल्ला कृषी आयुक्‍तांनी दिला.
योजनांच्या अंमलबजावणीबाबत नाराजी

अमरावती व नागपूर विभागाचा आढावा घेताना काही योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बैठकीतच झाडाझडती घेतली. कृषी यांत्रिकीकरणावर येत्या काळात भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्याकरीता अतिरिक्‍त उद्दीष्ट निश्‍िचत केले जाईल, असेही आयुक्‍त म्हणाले. बैठकी दरम्यान वातावरण चांगलेच गंभीर झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढली होती.

इतर ताज्या घडामोडी
कोयना धरणातून १०७ टीएमसी विनावापर...सातारा ः जिल्ह्यासह कोयना धरणात विक्रमी पाऊस...
चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला ः...मुंबई ः केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक...
द्राक्ष बागेमध्ये कलम करण्यासाठी...द्राक्ष विभागामध्ये सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले...
विनाअट कर्जमुक्तीसाठी परभणीत...परभणी : ‘शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी खडकवाडी (ता...
उस्मानाबादमध्ये पॉलिहाउस-शेडनेटधारक...उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेकडो शेडनेट व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाची...परभणी : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत ४३ हजार...
सांगलीत डाळिंबाचा मृग बहर संकटातसांगली : राज्यात डाळिंबाचा सुमारे ४० ते ५० टक्के...
आंबोलीत सर्वाधिक पाऊससिंधुदुर्ग : राज्यात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
अकोला येथे जिल्हास्तरीय विषबाधा...अकोला  ः कीटकनाशक फवारताना खबरदारी घेण्यास...
अकोट बाजार समिती सभापतिपदी गावंडे, तर...अकोला  ः जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार...
मत्स्यविज्ञान महाविद्यालयातून होईल...अमरावती  ः जिल्ह्यात मत्स्यव्यवसायासाठी...
व्यवसायातील तंत्रज्ञानामुळे दूध...नागपूर  ः ‘विदर्भ व मराठवाड्यातील...
खडकवासला कालव्याद्वारे इंदापूरसाठी...शेटफळगढे, जि. पुणे : खडकवासला कालव्याद्वारे ९...
पुणे : नाट्यमय घडामोडीनंतर स्थायी...पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी...
भंडारदरा, मुळा पाणलोटात जोरदार पाऊसनगर ः काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोले...
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
राज्यात साठ लाख रोजगारनिर्मितीचा दावा...मुंबई ः राज्यात पाच वर्षांत ६० लाख रोजगार...
खानदेशात मुगाची आवक रखडली जळगाव  ः खानदेशात जळगाव, चोपडा बाजारात मागील...
सोलापूर जिल्हा परिषदेकडून कृषी...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी...