मधमाशीपालन प्रशिक्षणाच्या शुल्कात वाढ

मधमाशीपालन प्रशिक्षणाच्या शुल्कात वाढ
मधमाशीपालन प्रशिक्षणाच्या शुल्कात वाढ

पुणे  ः केंद्रीय मधमाशीपालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेमार्फत राज्यासह, इतर राज्यातील शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मधमाशीपालनाचे प्रशिक्षण देण्यात येते. चालू वर्षीपासून मधमाशीपालनाच्या प्रशिक्षण शुल्कात जवळपास ७५० रुपयापर्यंत वाढ केली आहे. याशिवाय प्रशिक्षणासाठी जीएसटीची रक्कमही आकारली जाणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना आता जादा शुल्क मोजावे लागणार आहे. मधमाशीपालन व्यवसायाकडे वळविण्यासाठी राज्य व केंद्र शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण मिळावे आणि त्यातून मधासह, शेतीच्या उत्पादनात वाढ करावी, हा मुख्य उद्देश या केंद्राचा आहे. आखील भारतीय स्तरावर एकमेव अशी मधमाशीपालनावर संशोधन व प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे. मागील अनेक वर्षापासून केंद्रीय मधमाशीपालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने क्षमता कार्यक्रमाअंतर्गत मधमाशीपालन प्रमाणपत्र हा एक महिना, अल्पावधी मधमाशीपालन प्रमाणपत्र पाच दिवस, आग्या मधमाशीपालन प्रशिक्षण पाच दिवस आणि मध परिक्षण प्रशिक्षण एक दिवस असे प्रशिक्षण कोर्स राबविले जात आहे. त्यासाठी १६ ते ४५ या वयोगट आणि दहावी उत्तीर्ण असलेल्या व्यक्तींना प्रशिक्षण घेता येते. त्यासाठी साधारणपणे जास्तीत जास्त २५० ते ८०० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, यंदापासून या शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुमारे ७५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे.  मागील पाच वर्षात सुमारे १६ हजाराहून अधिक शेतकरी, विद्यार्थ्यांना मधमाशीपालनाचे विविध प्रशिक्षणे दिले आहेत. अनेक नागरिकांनी हे प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस प्रशिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच मधमाशीपालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेने शुल्क वाढ केली आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थीला यापुढे जादा शुल्क भरून प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींची राहण्याची व्यवस्था वसतिगृहामध्ये सशुल्क असून जेवणाची व्यवस्था स्वतः करावी लागणार आहे. याशिवाय प्रशिक्षणाच्या सुरुवातीला मधमाशा प्रमाणपत्र प्रशिक्षणाकरिता एक हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे.      

प्रशिक्षणासाठी घेतले जाणारे प्रशिक्षण शुल्क, रुपये

प्रशिक्षण     कालावधी पूर्वीचे प्रशिक्षण शुल्क नवीन प्रशिक्षण शुल्क (जीएसटी रक्कम वेगळी)
मधमाशापालन प्रमाणपत्र एक महिना ८००  ११८०
अल्पावधी मधमाशीपालन प्रमाणपत्र  पाच दिवस  ५००  १००० (व्यक्तिगत)
अल्पावधी मधमाशीपालन प्रमाणपत्र  पाच दिवस  ८००  १५०० (प्रायोजित)
आग्या मधमाशीपालन प्रशिक्षण  पाच दिवस  ५०० ५०० (व्यक्तिगत)
आग्या मधमाशीपालन प्रशिक्षण  पाच दिवस   ७००  ७०० (व्यक्तिगत)
मध परिक्षण प्रशिक्षण   एक दिवस २५० १०००

केंद्रीय मधमाशीपालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेमार्फत क्षमता निर्माण कार्यक्रमाअंतर्गत साधारणपणे विविध प्रकारचे प्रशिक्षण शेतकरी, विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जात होते. चालू वर्षी तीन प्रकारच्या प्रशिक्षण शुल्कात वाढ संस्थेने केली आहे. याशिवाय प्रशिक्षणार्थींना जीएसटीची रक्कमही वेगळी भरावी लागणार आहे. - सुनील पोकरे, सहसंचालक, प्रशिक्षण विभाग, केंद्रीय मधमाशीपालन प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com