Increase in garlic intake; Rising rates improve
Increase in garlic intake; Rising rates improve

लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत सुधारणा

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाची आवक २,७१५ क्विंटल झाली. आवकेत वाढ झाली असून त्यास किमान ४,०००, तर कमाल १०,५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सध्या मागणी असल्याने उठाव आहे.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाची आवक २,७१५ क्विंटल झाली. आवकेत वाढ झाली असून त्यास किमान ४,०००, तर कमाल १०,५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सध्या मागणी असल्याने उठाव आहे. त्यामुळे दरांत सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

चालू सप्ताहामध्ये कांद्यांची आवक ६,७३० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल दर ३५० ते ८०० होते. बटाट्याची आवक ४,९३६ क्विंटल झाली. प्रतिक्विंटल दर १,५०० ते २,१५० होते. आल्याची आवक २८५ क्विंटल झाली. त्यास ६,०००ते ८,००० प्रतिक्विंटल दर मिळाला.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाली. बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. हिरवी मिरचीची आवक १,५०१ क्विंटल झाली. तिला १,५०० ते ३,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजारपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर राहिले. लवंगी मिरचीला १,५०० ते २,६००, तर ज्वाला मिरचीला १,५०० ते ३,५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. वालपापडीच्या घेवड्याची आवक २,३४५ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल २,००० ते २,५०० दर मिळाला.

घेवड्याला १,५०० ते ५,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. चालू सप्ताहात आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव कमी झाले. गाजराची आवक १३३५ क्विंटल झाली. त्यास १,००० ते १,५०० प्रतिक्विंटल दर मिळाले.

फळभाज्यांच्या दरात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. टोमॅटोला २०० ते ५२५,वांगी २०० ते ४३०, फ्लॉवर १४० ते २७५ असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर, कोबीला ४० ते १६० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरचीला ३०० ते ४५० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा १२५ ते ३७५, कारले १५० ते २७०, गिलके २०० ते ३५०, तर काकडीला २००ते ३७५ दर मिळाला.  फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ४७० क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते १,००० प्रती क्विंटल मिळाला. मोसंबीची आवक ३७५ क्विंटल झाली. तिला १,००० ते ४,००० प्रतिक्विंटल दर मिळाला. डाळिंबांची आवक ६६८४ क्विंटल झाली.

आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ६०० ते ४७५० व मृदुला वाणास ५०० ते ७,६५० प्रतिक्विंटल दर मिळाला. टरबुजाची आवक ६० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये दर मिळाला. पपईची आवक १०० क्विंटल झाली. त्यास ७०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नारळाची आवक ७३८ क्विंटल झाली. त्यास २,१०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आंब्यांची आवक १,१२० क्विंटल झाली. दशहरी आंब्यास प्रतिक्विंटल ३,००० ते ५,००० दर मिळाला. 

भाजीपाल्याला प्रति १०० जुड्यांचा दर

कोथिंबीर  ५०० ते ४५००
मेथी १००० ते ३५००
शेपू   ७०० ते २०००
कांदापात  ५०० ते २०००
पालक २२५ ते ३७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com