agriculture news in marathi, Increase in grape farm in Palus taluka | Agrowon

पलूस तालुक्यात द्राक्ष बागक्षेत्रात वाढ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019

पलूस, जि. सांगली : पलूस तालुक्यात द्राक्ष बागक्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. तालुक्यात द्राक्ष बागेचे क्षेत्र जवळजवळ दोन हजार हेक्टच्या घरात जाऊन पोचले आहे. पलूस तालुका सधन तालुका समजला जातो. तालुक्यात प्रामुख्याने ऊस हे पीक घेतले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षांत येथील तरुण शेतकरी द्राक्ष शेतीकडे वळल्याचे चित्र आहे. पाच वर्षांपूर्वी एक हजार हेक्टर द्राक्ष बागाचे क्षेत्र होते. सध्या हे क्षेत्र जवळजवळ दोन हजार हेक्टरवर पोचले आहे.

पलूस, जि. सांगली : पलूस तालुक्यात द्राक्ष बागक्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. तालुक्यात द्राक्ष बागेचे क्षेत्र जवळजवळ दोन हजार हेक्टच्या घरात जाऊन पोचले आहे. पलूस तालुका सधन तालुका समजला जातो. तालुक्यात प्रामुख्याने ऊस हे पीक घेतले जायचे. मात्र, गेल्या काही वर्षांत येथील तरुण शेतकरी द्राक्ष शेतीकडे वळल्याचे चित्र आहे. पाच वर्षांपूर्वी एक हजार हेक्टर द्राक्ष बागाचे क्षेत्र होते. सध्या हे क्षेत्र जवळजवळ दोन हजार हेक्टरवर पोचले आहे.

द्राक्ष शेतीत आलेले नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तरुण शेतकरी द्राक्षाचे विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन घेत आहेत. पूर्वी हात पंप किंवा पेट्रोल पंपाने औषध फवारणी करावी लागत होती. मात्र, आता ट्रॅक्टरने फवारणी तंत्रज्ञान आल्याने शेतकऱ्यांचा बराच त्रास कमी झाला आहे. इतरही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

प्रामुख्याने सोनाका, शरद सीडलेस, तास ए गणेश, थाँमसन व इतर काही जातीच्या द्राक्षाचे उत्पादन घेतले जात आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची निर्यात होत आहे. बेदाणाही मोठ्या प्रमाणावर तयार केला जातो. बेदाण्यालाही बाजारपेठ चांगली आहे. इतर कुठल्याही पिकापेक्षा कितीतरी पटीने द्राक्षातून उत्पन्न मिळते, असे द्राक्षबागायतदारांचे म्हणणे आहे.

द्राक्षाला मागणी

द्राक्षबागांचे क्षेत्र कितीही वाढले तरी, भारतातच द्राक्षाला मोठी मागणी आहे. सांगली, नाशिक, सोलापूर अशा ठराविक ठिकाणी द्राक्षाचे उत्पादन होते. त्यामुळे देशातील मागणीच्या तुलनेत उत्पादन फारच कमी आहे, असे द्राक्ष तज्ज्ञांचे मत आहे.

द्राक्ष बाग उभारणी खर्च वाढला

सध्या स्टील, मजुरी, खते, औषधे यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यातच बँकेत द्राक्षबाग उभारणीसाठी खरेदी साहित्याचे जीएसटी बीले सादर करावी लागतात. १८ टक्के जीएसटी, १० टक्के विमा आणि बँकेचे व्याज १० ते १२ टक्के म्हणजे बँकेचे कर्ज जवळपास ४० टक्के व्याजाने शेतकऱ्यांना घ्यावे लागते. सुरवातीचे पीक येईपर्यंत पहिल्या वर्षात दहा ते बारा लाख रुपये खर्च येतो. बँकांनी ऐच्छिक विमा करावा, अशी मागणी होत आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...