जळगाव जिल्ह्यातील भूजलपातळीत वाढ

जळगाव जिल्ह्यातील भूजलपातळीत वाढ
जळगाव जिल्ह्यातील भूजलपातळीत वाढ

जळगाव : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी पावसामुळे पाण्याची पातळी खालावली होती. परंतु, यंदा पावसाळा चांगला झाल्याने जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणामध्ये सरासरी ७६.३७ मीटरने पातळीत वाढ झाल्याची माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागामार्फत देण्यात आली आहे.

भूजल सर्वेक्षण विभाग दरवर्षी चार वेळा सर्वेक्षण करून भूजलपातळीचा अंदाज घेत असतो. प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्येच पाऊस संपत असतो. परंतु, यंदा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात जोरदार अतिवृष्टी झाल्याने भूजलपातळी सर्वेक्षण आणखी एकदा विभागाला करावे लागणार असल्याचे दिसत आहे. भूजल विभागातर्फे जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबर या महिन्यांत सर्वेक्षण केले जाते. यातील मोजणीची तुलना काढून भूजलपातळीची घट किंवा वाढ, याबाबत निष्कर्ष काढण्यात येतो.

भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांतील सुमारे १८२ विहिरींचे निरीक्षण केले असून, त्यावरून भूजलपातळी निश्‍चित केली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये केलेल्या विहिरींच्या निरीक्षणात १८२ पैकी १५४ विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, जिल्ह्यात ७६.३७ मीटरने पाणीपातळी वाढली आहे. 

समाधानकारक पाऊस झाल्याने व मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असले, तरी याचा फायदा काही शेतकऱ्यांना होणार आहे. शिवाय, उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईपासून थोडाफार दिलासा मिळाला आहे. 

सप्टेंबर २०१९ पर्यंत तालुक्‍यांची स्थिर भूजलपातळी (मीटरमध्ये ) ः मुक्ताईनगर - ६.१२, रावेर - १२.६८, भुसावळ - २.१०, बोदवड - १.८३, यावल - १७.२८, जामनेर - २.०४, जळगाव - ९.१२, धरणगाव - २.४१, एरंडोल - ०.७०, चोपडा - ६.७२, अमळनेर - २.०५, पारोळा - १.०४, पाचोरा - २.१४, भडगाव - २.६१, चाळीसगाव - २.५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com