Agriculture news in marathi; Increase in incidence of burning of beans | Agrowon

सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये वाढ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी कारणांमुळे काढणीला आलेले पीक आगीमुळे नष्ट झाल्याचे दुर्दैवी प्रकार वाढत चालले आहे. या आठवड्यात जिल्ह्यात पाच ठिकाणी शेतकऱ्यांनी सोंगणी करून ठेवलेले सोयाबीनला आग लागल्याच्या घटना घडल्या. यामुळे लाखोंचे नुकसान शेतकऱ्यांना झेलावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार ते पाच दिवसांत जिल्ह्यात माळविहीर, उत्रादा, सुभानपूर, मांडवा, राजूर येथे सोयाबीन सुडीला आग लागल्याचे प्रकार घडले. या आगींमुळे शेतकऱ्यांचे पाच लाखांवर नुकसान झाले आहे.

बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी कारणांमुळे काढणीला आलेले पीक आगीमुळे नष्ट झाल्याचे दुर्दैवी प्रकार वाढत चालले आहे. या आठवड्यात जिल्ह्यात पाच ठिकाणी शेतकऱ्यांनी सोंगणी करून ठेवलेले सोयाबीनला आग लागल्याच्या घटना घडल्या. यामुळे लाखोंचे नुकसान शेतकऱ्यांना झेलावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार ते पाच दिवसांत जिल्ह्यात माळविहीर, उत्रादा, सुभानपूर, मांडवा, राजूर येथे सोयाबीन सुडीला आग लागल्याचे प्रकार घडले. या आगींमुळे शेतकऱ्यांचे पाच लाखांवर नुकसान झाले आहे.

बुलडाणा तालुक्यातील माळविहीर येथे रामदास देशमुख यांचे पाच एकरांतील सोयाबीन सोंगणी करून त्याची सुडी लावण्यात आली होती. पुढील दोन-तीन दिवसात यंत्राद्वारे ते काढणी करणार होते. परंतु, सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याचे मंगळवारी (ता. १५) त्यांना दिसून आले. त्यांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बुलडाणा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

चिखली तालुक्यातील उत्रादा येथेही सुडीला आग लागून दोन लाखांचे नुकसान झाले. सदाराम इंगळे यांची तीन एकरांतील सोयाबीन काही दिवसांपूर्वी सोंगणी करून ठेवलेली होती. त्यांच्या या सुडीला आग लागली. मेहकर तालुक्यातील सुभानपूर येते अर्जुन काळे यांचे दीड एकरातील सोयाबीन आगीत जळून खाक झाले. त्यांनीही मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मोताळा तालुक्यातील राजूर तसेच लोणार तालुक्यातील मांडवा या गावातही सोयाबीनच्या सुड्या जळाल्या.     

हातातोंडाशी आलेला घास हिरावतोय 
ग्रामीण भागात किरकोळ कारणावरून होणाऱ्या वादांतून अशा घटना वाढल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जाते. द्वेषातून हातातोंडाशी आलेले पीक पेटवून नष्ट केले जाते. या घटनांचा तपासही लागत नसल्याने हे गुन्हेगार मोकळे फिरतात. हंगाम सुरू झाला की पीक पेटविण्याचे प्रकार घडतात. त्याच्या पोलिस तक्रारीसुद्धा शेतकरी करतो. परंतु याबाबत गांभीर्याने तपास न होणे, आरोपी न सापडणे असे प्रकार सर्रास होत असतात. राबराब राबून पिकवलेले पीक नष्ट होत असल्याची झळ शेतकऱ्याला सहन करावी लागते आहे. 

इतर ताज्या घडामोडी
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...