Agriculture news in marathi Increase in incidence of red onion in Khandesh | Agrowon

खानदेशातील लाल कांद्याच्या आवकेत वाढ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

जळगाव  ः खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर मागील पंधरवड्यापासून कमी होत असून, प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपयांपर्यंत दर आहेत. कांदा दरात अल्प घसरण पाहायला मिळत आहे. कांदा विक्रीदेखील यामुळे वाढली आहे. 

जळगाव  ः खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर मागील पंधरवड्यापासून कमी होत असून, प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपयांपर्यंत दर आहेत. कांदा दरात अल्प घसरण पाहायला मिळत आहे. कांदा विक्रीदेखील यामुळे वाढली आहे. 

कांद्याची आवक डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत कमी होती. परंतु, गेल्या १५ ते २० दिवसांत धुळे, साक्री (जि. धुळे), पिंपळनेर (ता. साक्री), अडावद (ता. चोपडा), जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात कांद्याची आवक वाढू लागली. जळगाव येथील बाजारात मागील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी ११०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.

डिसेंबरच्या सुरुवातीला ही आवक प्रतिदिन सरासरी ६०० क्विंटलपर्यंत होती. आवक फक्त जळगाव, भुसावळ, चोपडा भागांतून होत होती. परंतु, नंतर आवक वाढू लागली. अडावद, यावल तालुक्‍यांतील किनगाव येथील बाजारातही आवक वाढली आहे. 

धुळे येथे या आठवड्यात प्रतिदिन सरासरी १२०० क्विंटलपर्यंत आवक झाली आहे. जळगाव येथील बाजारात प्रतिदिन सरासरी १४०० क्विंटल आवक झाली आहे. सध्या आवक जळगाव, चोपडा, यावल, भुसावळ, जामनेर, पाचोरा, औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड, जालना आदी भागांतून होत असल्याचे सांगण्यात आले. कांद्याला जळगाव बाजार समितीत प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपयांपर्यंतचे दर आहेत. असेच दर अडावद, धुळे व पिंपळनेर भागांत आहेत. दर्जेदार कांद्याची आवक सध्या होत आहे. 

दरम्यान, काही शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली होती. परंतु, दर कमी होत असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. कांद्याची काढणी सर्वत्र आटोपली आहे. सर्वाधिक उत्पादन साक्री, चोपडा, यावल, भुसावळ व जामनेर भागांत झाले आहे. दर कमी झाल्याने काही शेतकरी मध्य प्रदेशातील इंदूर, बडवानी येथील बाजारासह गुजरातमधील सुरत, बडोदा येथेही कांद्याची पाठवणूक करीत आहेत. तेथेही दर २८०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक नसल्याची स्थिती आहे. 


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...