Agriculture news in marathi To increase investment in Mihan Suggestion from Energy Minister Nitin Raut | Page 2 ||| Agrowon

‘मिहान’मध्ये गुंतवणूक वाढविण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची सूचना

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प हा पाठपुराव्याच्या उदासीनतेमुळे मागे राहता कामा नये. नवी दिल्ली, मुंबई येथे ‘ अँडव्हन्टेज विदर्भ’च्या धर्तीवर गुंतवणूक संमेलनाचे आयोजन करा, अशी सूचना ऊर्जामंत्री, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.

नागपूर : विदर्भाचे भविष्य बदलविणारा मिहान प्रकल्प हा पाठपुराव्याच्या उदासीनतेमुळे मागे राहता कामा नये. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे ‘ अँडव्हन्टेज विदर्भ’च्या धर्तीवर गुंतवणूक संमेलनाचे आयोजन करा, अशी सूचना ऊर्जामंत्री, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.

मिहान येथे डॉ. नितीन राऊत यांनी भेट दिली. या प्रकल्पाअंतर्गत गुंतवणूक क्षेत्रात सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महाराष्ट्र विमानतळ विकास तांत्रिक कंपनीचे (एमएडीसी) तांत्रिक सल्लागार सुभाष चहांदे, मुख्य अभियंता एस. के. चॅटर्जी, मार्केटिंग मॅनेजर योगेश धारकर, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी, नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रूही, विद्युत सल्लागार केशवराव इंगोले, मिहान एसईझेडचे विशेष अधिकारी दिनेश नानल, दीपक कुमार,  भंडारी, मिहान इंडस्ट्रिअल असोसिएशनचे मनोहर भोजवानी, ऊर्जा विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीत मिहान प्रकल्प गतिशील करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी हैदराबाद, मुंब्रा, इंदोर, विशाखापट्टणम व भारतात ज्या-ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रोजेक्ट उभे राहिले आहेत. त्या ठिकाणी केलेल्या उपाययोजना मिहानमध्ये सुरू करण्यासाठी अभ्यास गटांचे गठण करा. प्रकल्पाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आवश्यक विषयांवर बैठक लावण्यात यावी.

या बैठकीमध्ये लघु व मध्यम प्रकल्पातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठीचे नवीन धोरण ठरवण्यात यावे, लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना जागा देणे, कौशल्य विकास व प्रशिक्षण, नाईट पार्किंग, आंतरराष्ट्रीय विमान सेवा, ऑटोमोबाइल्स, लॉजिस्टीक क्षेत्रातील गुंतवणूक वाढ, आदी विषयांवर धोरण ठरवता येईल. 

अनेक उद्योग संस्थांना नागपूर हा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे उद्योग जगतातील मान्यवरांचे ‘अॅडव्हन्टेज विदर्भ’ किवा विदर्भात गुंतवणुकीची संधी, अशा आशयाचे गुंतवणूक संमेलन नवी दिल्ली व मुंबई येथे आयोजित करण्यात यावे. जेणेकरून मिहानमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या शहरातील उद्योग समूहांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना या प्रकल्पाबाबतची माहिती मिळेल. मात्र, हे संमेलन घेण्यापूर्वी मिहान येथे गुंतवणूक करणाऱ्यांना कोणत्या सवलती दिल्या जातील, याची आश्वासक तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.मिहानसारखा प्रकल्प हा विदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांच्या पसंतीचा प्रकल्प असून, यासाठी प्रसंगी आपण सर्वांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...