मिरजच्या पूर्व भागातील सिंचन क्षेत्रात वाढ : मेढेदार

मिरजच्या पूर्व भागातील सिंचन क्षेत्रात वाढ : मेढेदार
मिरजच्या पूर्व भागातील सिंचन क्षेत्रात वाढ : मेढेदार

सांगली : मिरज पूर्वभाग हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र गेल्या चार वर्षांत झालेल्या जलयुक्त शिवारांच्या कामांमुळे आणि म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे या भागाला जलसंजीवनी मिळाली आहे. सुमारे ६ हजार ५३८ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. यामध्ये ऊस, द्राक्षे, केळी, पानमळे या बागायती क्षेत्राचा समावेश आहे. तालुका कृषी अधिकारी ए. व्ही. मेढेदार यांनी ही माहिती दिली.

सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाने या भागातील शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नदेखील मर्यादित होते. राज्य सरकारने केंद्राच्या सहकाऱ्यातून कृष्णा नदीवर म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू केली. या योजनेचा सर्वात प्रथम लाभ मिरज तालुक्‍याला झाला.

म्हैसाळ योजनेचे पाणी मिळाले तरी सततच्या थकीत वीजबिलामुळे योजना अनेकवेळा बंद करण्याची नामुष्की येऊ लागली. त्या शिवाय म्हैसाळ योजनेतून सोडलेले पाणी लगेच वाहून जात होते. या पाण्याचा साठा होत नव्हता. त्यामुळे या परिसरातील बागायती क्षेत्र धोक्‍यात येऊ लागले. म्हैसाळ योजनेचे थकबाकी दिवसेंदिवस वाढत गेल्यानंतर योजनेचा अवर्षण काळ सहा ते सात महिन्यांपर्यंत वाढू लागला. परिणामी शाश्वत पाण्याची शक्‍यता कमी होऊ लागली.

मिरज तालुक्‍यात मागील तीन वर्षांत जलयुक्त शिवारमधून १ हजार ७०७ कामे झाली आहे. यामध्ये ओढा रुंदीकरण, नाला बडिंग, सिमेंट बंधारे, माती बंधारे, सीसीटीची कामे जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आली. मिरज पूर्वच्या १३ गावांमध्ये सन २०१५-१६ मध्ये २८४ कामे झाली. त्यासाठी सुमारे ४ कोटी ५० लाख रुपये खर्च झाला. या माध्यमातून १ हजार ७०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले. सन २०१६-१७ मध्ये १७ गावांमध्ये ६०० कामे झाली. त्याद्वारे ३ हजार ९४३ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले. त्यासाठी ८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च झाला. सन २०१७-१८ मध्ये १३ गावांत ८२३ कामे झाली असून २ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला.

गतवर्षी या कामातून ८९५ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले. मागील तीन वर्षांत ६ हजार ५३८ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com