अमरावती जिल्ह्याची सिंचनक्षमता वाढवा ः ठाकूर

अमरावती जिल्ह्याची सिंचनक्षमता वाढवा ः ठाकूर
अमरावती जिल्ह्याची सिंचनक्षमता वाढवा ः ठाकूर

अमरावती  ः जिल्ह्यातील सिंचनक्षमता ही अत्यल्प आहे. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी सिंचनसाठा निर्माण करता येणे शक्‍य आहेच अशा ठिकाणचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील सिंचनक्षमता महत्तम करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. जलसंपदा विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी आमदार बळवंत वानखेडे, अधीक्षक अभियंता बहादुरे, रश्‍मी ठाकरे यांच्यासह जयंत देशमुख, वैभव वानखडे, प्रकाश टेकाडे, विक्रम धोटे, अतुल देशमुख, संजय कळसकर, सचिन ठोके, चंद्रकांत जवंजाळ उपस्थित होते. राज्यात अत्यल्प सिंचनक्षमता असलेल्या जिल्ह्यांपैकी अमरावती हा एक आहे. जोपर्यंत सिंचनक्षमता वाढणार नाही, तोपर्यंत जलसंपदा विभागाला कार्य करावे लागणार आहे. विस्तृत प्रमाणात सिंचन असल्याशिवाय शेती ओलिताखाली येणार नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार नाही. त्यामुळे सिंचनक्षमतेच्या वाढीचा आराखडा येत्या १५ दिवसांत तयार करण्याची सूचना ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली. जिल्ह्यात पाणी वापर संस्थांची संख्या अत्यल्प आहे. प्रकल्प पूर्ण होताच पाणी वापर संस्था स्थापन करून त्यांना निश्‍चित क्षेत्र वाटप करावे, तसेच पाण्याचे वितरण आणि पाटसरींची देखभाल आदी कामेही संस्थांकडून करून घेता येणे शक्‍य आहे. अधिकाधिक पाणी वापर संस्था स्थापन करून त्या कार्यरत कराव्यात. पाण्याच्या वितरणामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. येत्या काळात पाणी वापर संस्था अधिकाधिक नोंदणी होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.  निधीची कमतरता सिंचन प्रकल्पांसाठी  आवश्‍यक निधी मिळत नसल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी  दिली. त्यावर जलसंपदामंत्र्यांकडे यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे महिला व बालविकासमंत्री ठाकूर यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com