बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ; ग्रामस्थांत दहशत

Increase in leopard attacks; Terror in the satara rural area
Increase in leopard attacks; Terror in the satara rural area

मलकापूर, जि. सातारा ः बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्यांसह एक मेंढी ठार केल्याची घटना जखीणवाडी (ता. कऱ्हाड) येथील माउलीची पट्टी व सनद नावाच्या शिवारात घडली. जनावरांच्या शेडात जाऊन बिबट्या हल्ला करत असल्याने जखीणवाडी विभागात बिबट्याची दहशत कायम आहे. 

आगाशिव डोंगरपायथ्याला जखीणवाडीपासून काही अंतरावर माउलीचा मळा नावाच्या शिवारात आनंदा डाईंगडे (रा. जखीणवाडी) यांचे घर आहे. त्यांच्या घरामागेच ४० पेक्षा जास्त मेंढ्या बांधलेल्या असतात. मेंढराच्या कळपाला संरक्षण म्हणून वाघर लावली जाते. 

रविवारी रात्री डाईंगडे मेंढरांना वाघर लावून घरी गेले. सकाळी वाघर काढण्यासाठी गेल्यावर त्यांना एका मेंढीच्या नरड्याचा चावा घेऊन ठार केल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर तेथून जवळच सनद नावाचे शिवारातील सुनील नलवडे यांच्या जनावरांच्या शेडमधील दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. 

वनविभागाला माहिती दिल्यावर वनपाल ए. सी. सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनास्थळी मिळालेल्या ठशांवरून हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. नावडी (वेताळवाडी, ता. पाटण) येथील गोठ्यातील बकरीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बकरी जखमी झाली. मात्र, शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे तिचे प्राण वाचले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

पंधरा दिवसांपासून नावडी, खिलारवाडी, मल्हारपेठ, ठोमसे परिसरात जवळपास चार शेळ्यांसह दोन बोकडांचाही बिबट्याने फडशा पाडला आहे. नावडी वसाहत येथील राजू मुल्ला यांचा जनावरांच्या गोठ्यात सोमवारी रात्री साडेतीनच्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला केला. अचानक गोठ्यातून बकरीचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यावर मुल्ला स्वत: गोठ्याकडे धावले. त्या वेळी गोठ्यातील दृश्‍य पाहून तेही मोठ्याने ओरडले. त्याचवेळी त्यांचे समोरून बिबट्याने रस्त्याच्या पलिकडे असलेल्या उसाच्या शेताकडे धूम ठोकली. दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com