शासकीय तूर खरेदीची मर्यादा वाढवा

शासकीय तूर खरेदीची मर्यादा वाढवा
शासकीय तूर खरेदीची मर्यादा वाढवा

जळगाव ः दुष्काळाचे कारण, घटलेली उत्पादकता आदी कारणांमुळे खानदेशात तूर खरेदीसंबंधी प्रतिहेक्‍टरी चार क्विंटल ७० किलो, अशी मर्यादा शासकीय तूर खरेदीसंबंधी शासनाने लागू केली आहे. ही मर्यादा किंवा निकष दूर करून खरेदीची मर्यादा वाढवावी, नियमात सुधारणा करावी, अशा आशयाची मागणी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मागील महिन्यात ई-मेलद्वारे केली. परंतु या संदर्भात शासनाने सकारात्मक कार्यवाही केलेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

गाळण (ता. पा चोरा, जि. जळगाव) येथील शेतकरी अतिश पाटील व इतर शेतकऱ्यांनी तूर लागवड केली आहे. तुरीची मागील हंगामातही त्यांनी लागवड करून तिची विक्री शासकीय खरेदी केंद्रात केली होती. मागील हंगामात हेक्‍टरी १० क्विंटलपर्यंतची खरेदी झाली होती. या हंगामातही तूर शासकीय केंद्रात विक्रीसंबंधी नोंदणी केली. परंतु, या हंगामात हेक्‍टरी चार क्विंटल ७० किलोच तूर खरेदीचा निकष आहे. 

यासंदर्भात मागील महिन्यातच त्यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून निकषात बदल करण्याची मागणी केली. मंत्री देशमुख यांनी आपल्याला एक निवेदन सादर करा, असे सांगितले. यानंतर संबंधित अतिश पाटील यांनी पणनमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, मार्केटिंग फेडरेशनच्या संबंधितांना मेल पाठविला. त्यात हेक्‍टरी चार क्विंटल ७० किलो तूर खरेदीचा निकष बदलावा, असा मुद्दा ठळकपणे मांडला. पणनमंत्री यांच्या कार्यालयातर्फे मेल प्राप्त झाला व तो पुढे जळगाव जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन व इतर यंत्रणेला पाठविला जाईल, असे स्पष्टही करण्यात आले. 

यासंदर्भात काही दिवसांपूर्वी शेतकरी पाटील यांनी मार्केटिंग फेडरेशनला विचारणा केली असता, आपल्याला शासनाकडून कुठलाही मेल किंवा नवे आदेश प्राप्त झालेले नसल्याचे सांगण्यात आले. ई-मेलबाबतचा पाठपुरावा व रोजचे संपर्क यातच अनेक दिवस गेले. अखेरीस आपण शासकीय खरेदी केंद्रात हेक्‍टरी चार क्विंटल ७० किलो तुरीची विक्री केली. हेक्‍टरी १० क्विंटल उत्पादन आले आहे. उर्वरित तूर बाजारात हमीभावापेक्षा कमी दरात द्यावी लागेल, असे शेतकरी पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com