Agriculture news in Marathi Increase in micro irrigation subsidy | Agrowon

सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021

केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेच्या मापदंडात चांगले बदल केले आहेत. ठिबक व तुषार संचासाठी खर्चमर्यादांमध्ये १० ते १३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे अनुदानदेखील वाढून मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुणे ः केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेच्या मापदंडात चांगले बदल केले आहेत. ठिबक व तुषार संचासाठी खर्चमर्यादांमध्ये १० ते १३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे अनुदानदेखील वाढून मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विविध पिकांच्या लागवड अंतरानुसार शेतकरी ठिबक व तुषारसंच बसवतात. केंद्राने त्यासाठी खर्चमर्यादा आणि अनुदानमर्यादा यापूर्वी २०१६ मध्ये निश्‍चित केल्या होत्या. त्यात बदल करण्याची मागणी राज्यातील ठिबक उद्योग व कृषी विभागाकडून सातत्याने केली जात होती. शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप थेट बॅंक खात्यात करण्याची अट केंद्राने कायम ठेवलेली आहे. त्यामुळे राज्य शासनदेखील महाडीबीटीच्या सध्याच्या ठिबक नियमावलीत बदल करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

१.२ मीटर × ०.६ मीटर लागवड अंतरासाठी एक हेक्टरवर ठिबकसंच बसविल्यास २०१६ च्या नियमावलीनुसार एक लाख १२ हजार २३७ रुपये अनुदान मिळत होते. आता हेच अनुदान एक लाख २७ हजार ५०१ रुपये मिळेल. तुषारसंचासाठी पूर्वी हेक्टरी १९ हजार ५४२ रुपये अनुदान मिळत होते. आता नव्या धोरणानुसार २१ हजार ५५८ रुपये मिळतील.  

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी ५५ टक्क्यांपर्यंत व इतर शेतकऱ्यांसाठी ४५ टक्क्यांपर्यंत अनुदान देणारे पूर्वीचे निकष मात्र बदलण्यात आलेले नाहीत. सूक्ष्मसंच अनुदानात पर्यायी सामग्रीला देखील अनुदान मिळते. खत टाकी, कचरा गाळणी, माती व अन्य जड घटक वेगळे करणारे उपकरण अशी पर्यायी सामग्री यापूर्वी केंद्राच्या अनुदान कक्षेत होती. मात्र राज्याकडून अनुदान दिले जात नव्हते. परंतु नव्या निकषानुसार सॅन्ड फिल्टर, हायड्रो सायक्लॉन फिल्टर (सॅन्ड सेप्रेटेर), फर्टिलायझर्स टॅंक व ठिबक नळी गुंडाळणारे अवजारदेखील (ड्रीप लाइन वाइंडर) आता अनुदान कक्षेत आले आहे. त्यामुळे ठिबक उद्योगातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

राज्यातील ऊस, भाजीपाला, कापूस उत्पादक मोठ्या संख्येने ठिबककडे वळतो आहे. मात्र या पिकांना योग्य ठरणाऱ्या अंतराला अनुदान मिळत नव्हते. ही बाब केंद्राच्या निदर्शनास आणली गेली. त्यामुळे आता खास या पिकांना डोळ्यासमोर ठेवत १.५ मीटर × ०.६ मीटर लागवड असे नवे लागवडअंतर मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे या अंतरानुसार एक हेक्टरवर ठिबक संच बसविल्यास शेतकऱ्याला एक लाख १४ हजार ४५१ रुपये अनुदान मिळू शकेल. 

कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात छोटे शेतकरी अर्धा एकरामध्ये ठिबक संच बसवून शेती करतात. मात्र छोट्या अंतरासाठी अनुदानाची तरतूदच नव्हती. केंद्राला हा मुद्दादेखील कळविण्यात आला होता. तो मान्य करीत आता अनुदान नियमावलीत १.५ मीटर × १.५ मीटर असे नवे अंतर ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यामुळे छोट्या शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख २१ हजार ५५६ रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अनुदान निकषात केलेले बदल असे

  • ठिबक संच खर्चमर्यादेत १३.५९ टक्के वाढ
  • तुषार संच खर्चमर्यादेतही १०.४६ टक्क्यांनी वाढ
  • ठिबक नळी गुंडाळणाऱ्या अवजाराला अनुदान 
  • नियमावलतीत अर्धा एकर क्षेत्राचा समावेश
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या राखीव निधीत अर्धा टक्क्यांनी वाढ

इतर अॅग्रो विशेष
सोयापेंड आयातीचा प्रस्ताव नाहीपुणे ः पोल्ट्री उद्योगाने सोयापेंड आयातीसाठी...
सरसेनाध्यक्ष हेलिकॉप्टर अपघातामध्ये...नवी दिल्ली ः तमिळनाडूमध्ये लष्करी हेलिकाॅप्टरला...
सोयाबीन हेक्टरी पिकले बारा क्विंटल ३५...लातूर : पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात...
‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून...औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या...
‘नाफेड’साठी खरेदी केलेला कांदा चाळीतच...नाशिक : केंद्राच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ‘...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच,...
देशात नवा खत कायदा आणण्याच्या हालचालीपुणे ः देशासाठी स्वतंत्र खत कायदा तयार करण्याच्या...
शेवग्याला दराची झळाळीकोल्हापूर : राज्यात नुकत्याच झालेल्या...
बायो-सीएनजी गॅसवर ट्रॅक्टर चालविण्याचा...माळेगाव, जि. पुणे ः शेती आणि शेतीपूरक व्यवसाय...
बायोसिरप तंत्रामुळे इथेनॉल उद्योगाचे...पुणे ः उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करता येते;...
उसातील सोयाबीनचे एकरी १८ क्विंटल उत्पादनपुणे जिल्ह्यात कोऱ्हाळे बु. थोपटेवाडी (ता....
कांदा बीजोत्पादनात प्रावीण्य मिळवलेले...अंतापूर (ता.सटाणा. जि. नाशिक) येथील नानाजी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...