परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढ

परभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील खासगी दूध प्रक्रिया प्रकल्पांचे संकलन केंद्रे बंद आहेत. संचारबंदीमुळे हॅाटेल्स बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक दूध संकलन संस्थांमार्फत परभणी येथील शासकीय मध्यवर्ती दुग्ध शाळेस दूध पुरवठा केला जात असल्याने दैनंदिन दूध संकलनात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. दररोजच दूध संकलनात वाढ होत आहे. त्यामुळे योग्य व्यवस्थापन करता यावे यासाठी प्राथमिक संस्थांना दैनंदिन दूध पुरवठ्यासाठी क्वोटा निश्चित करुन देण्यात आला आहे.
Increase in milk collection in Parbhani Government Dairy

शासकीय दुग्ध योजनेअंतर्गंत परभणी येथील मध्यवर्ती दुग्ध शाळेला पुरवठा केलेल्या दुधाची देयके आणि प्राथमिक संस्थाचे कमीशन वेळेवर मिळत नसल्यामुळे तसेच जिल्ह्याच्या विविध भागात खासगी दूध प्रक्रिया प्रकल्पांची संकलन केंद्र सुरू झाल्यामुळे परभणी येथील दुग्धशाळेतील दूध संकलनात गेल्या काही महिन्यांपासून घट सुरू आहे. गेल्या महिन्यापासून पाथरी येथील शीतकरण केंद्रामार्फत होणारा दूध पुरवठा बंद आहे.

सध्या परभणी येथील स्थानिक, गंगाखेड येथील शीतकरण केंद्र तसेच एकदिवसा आड नांदेड येथील शीतकरण केंद्रमार्फत दुधाचा पुरवठा होत आहे. यंदा एक मार्च ते १५ मार्च या कालावधीत प्रतिदिन सरासरी ५ हजार ३७५ लिटर दूध संकलन झाले. परंतु सोमवार (ता. १६) पासून ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खासगी दूध प्रकल्प तसेच हॅाटेल्स यांना होणारा दूध पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे दुग्धशाळेतील दुग्ध संकलानात दररोज वाढ होत आहे. गुरुवारी (ता. २६) एकूण ९ हजार ३७० लिटर दूध संकलन झाले. शुक्रवारी (ता. २७) दूध संकलनात सुमारे दहा हजार लिटरपर्यंत वाढ झाली. 

दूध पुरवठ्यासाठी क्वोटा निश्चित ः साळवे जिल्ह्यातील खासगी दूध प्रकल्पांनी दूधाचे दर कमी केले आहेत. काही दिवसांपासून दूध संकलन देखील बंद केले आहे. त्यामुळे शासकीय दुग्धशाळेत अनियमित तसेच दूध पुरवठा न करणाऱ्या संस्था अचानकपणे मोठ्या प्रमाणावर दूध पुरवठा करत आहेत. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच योग्य व्यवस्थानासाठी प्राथमिक दूध पुरवठा संस्था दैनंदिन दूध पुरवठ्यासाठी क्वोटा निश्चित करुन देण्यात आला आहे, असे दुग्ध शाळा व्यवस्थापक आर. बी. साळवे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com