agriculture news in marathi increase the millet profit by value addition | Agrowon

बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफा

डॉ.साधना उमरीकर
सोमवार, 27 जानेवारी 2020

बाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास तयार केलेल्या पदार्थांचा कुरकुरीतपणा तसेच पौष्टीकपणा वाढण्यास मदत होते. तयार होणाऱ्या पदार्थाचे मूल्यवर्धन देखील होऊन ते पौष्टिक बनतात.

आपल्या आहारात विविधता आणल्यास शरीराचे योग्य प्रकारे पोषण होते. ऊर्जा, प्रथिने, कर्बोदके, खनिज द्रव्ये व जीवन सत्वे योग्य प्रमाणात शरीराला मिळाल्यास शरीर निरोगी राहते. मानवी शरीरास सर्वात जास्त उर्जा व कर्बोदके तृणधान्यापासून मिळतात. बाजरी अतिशय स्वस्त व पौष्टिक अन्नधान्य आहे. यात भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आहेत.

बाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास तयार केलेल्या पदार्थांचा कुरकुरीतपणा तसेच पौष्टीकपणा वाढण्यास मदत होते. तयार होणाऱ्या पदार्थाचे मूल्यवर्धन देखील होऊन ते पौष्टिक बनतात.

आपल्या आहारात विविधता आणल्यास शरीराचे योग्य प्रकारे पोषण होते. ऊर्जा, प्रथिने, कर्बोदके, खनिज द्रव्ये व जीवन सत्वे योग्य प्रमाणात शरीराला मिळाल्यास शरीर निरोगी राहते. मानवी शरीरास सर्वात जास्त उर्जा व कर्बोदके तृणधान्यापासून मिळतात. बाजरी अतिशय स्वस्त व पौष्टिक अन्नधान्य आहे. यात भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आहेत.

 • आयुर्वेद शास्त्राप्रमाणे बाजरी ही उष्ण गुणांनी युक्त मानली जाते. म्हणून आहारात बाजरीचा वापर थंडीच्या काळात जास्त प्रमाणात करणे फायदेशीर ठरते.
   
 • बाजरी उत्तम उर्जा स्त्रोत असून विविध प्रकारची खनिज द्रव्ये, जीवन सत्वे व लोहाने समृध्द आहे.
   
 • बाजरीच्या सेवनाने रक्तातील शर्करा वाढीचा दर इतर तृणधान्याच्या मानाने कमी आहे. त्यामुळे मधुमेही व्यक्तींच्या आहारात नियमित बाजरीचा वापर करावा.
   
 • बाजरीच्या सेवनाने हृदय विकार व पित्ताशयाचे विकार देखील कमी होतात. बाजरी लोहसमृद्ध असल्यामुळे बाजरीच्या सेवनाने रक्तक्षयास प्रतिबंध करण्यास मदत होते. यामुळे किशोरवयीन मुली, गर्भवती मातांच्या आहारात बाजरीचा उपयोग करणे फायदेशीर ठरतो.
   
 • हिवाळ्यात बाजरीची भाकरी, लोणी, वांग्याची भाजी किंवा भरीत, उन्हाळ्यात बाजरीच्या खारोड्या, पापड्या, शेंगदाणे व कांदा तसेच नाश्त्याला गरम खिचडी खाण्याची प्रथा आहे. बाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास तयार केलेल्या पदार्थांचा कुरकुरीतपणा तसेच पौष्टीकपणा वाढण्यास मदत होते. तयार होणाऱ्या पदार्थाचे मूल्यवर्धन देखील होऊन ते पौष्टिक बनतात.

बाजरीतील पोषक तत्वे 

पोषक तत्वे प्रमाण (प्रती १०० ग्रॅम)
प्रथिने ११.६ ग्रॅ.
स्निग्ध पदार्थ ५.० ग्रॅ.
इतर खनिजे २.३ ग्रॅ.
कर्बोदके ६७.५ ग्रॅ.
ऊर्जा . ३६१ ग्रॅ
कॅल्शियम ४२ मि. ग्रॅ.
फॉस्फरस २९६ मि. ग्रॅ.
लोह ८.० मि. ग्रॅ.
केरोटीन १३२ म्यु जी
पोटॅशियम ३७० मि. ग्रॅ.
जस्त  ५ मि. ग्रॅ.
मॅग्नेशियम १०६ मि. ग्रॅ.
तंतुमय पदार्थ १.३ टक्के

बाजरीचे मूल्यवर्धन 

प्राथमिक प्रक्रिया:

 • या टप्प्यात पहिल्यांदा कच्चा माल साफ केला जातो. त्यानंतर बाजरी चाळून धुवून स्वच्छ वाळविली जाते. त्यानंतर प्रतवारी करून विक्रीस पाठविली जाते.

प्राथमिक प्रक्रियेसाठी यंत्रे
डीस्टोनर:

 • या यंत्राने धान्यातील खडे, कचरा काढून धान्य साफ केले जाते.

डीहलर:

 • या यंत्राने धान्याचे टरफल काढले जाते. धान्याला पॉलिश केले जाते.

दुय्यम प्रक्रिया:

 • प्राथमिक प्रक्रिया झाल्यानंतर बाजरी अन्न म्हणून वापरण्यात येण्यासाठी त्यावर दुय्यम प्रक्रिया करतात. यापासून पीठ, भरडा, सोजी, रवा या सारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते.

प्रक्रियेसाठीची यंत्रे

पल्व्हलायझर यंत्र:

 • या यंत्राचा वापर करून धान्यापासून पीठ, रवा, भरडा तयार केला जातो.

फ्लोअर शिफ्टर:

 • हे यंत्र धान्याचे पीठ व रवा वेगळे करण्यासाठी वापरले जाते.

तिसरी प्रक्रिया 

 • तिसऱ्या टप्प्यात दुय्यम प्रक्रियेतून तयार झालेल्या बाजरीपासून विविध पदार्थ जसे की भाकरी, खारोड्या, पापड्या, खिचडी, चिवडा, लाह्या, शंकरपाळे निर्मिती केली जाते.
   
 • बाजरीचे पीठ इतर पिठात मिसळून अनेक मूल्यवर्धित पदार्थ बनविले जातात. परभणी येथील गृह विज्ञान महाविद्यालयाने बाजरीचे विविध पदार्थ तयार केले आहेत.

संपर्क ः डॉ. साधना उमरीकर, ९४२०५३००६७
(विषय विशेषज्ञ (गृह विज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जि. जालना)


इतर कृषी प्रक्रिया
प्रक्रिया उद्योगातील मक्याचे महत्त्वतृणधान्य प्रकारातील मका हे पीक मानवी आहारात,...
ड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया,...
कवठाची जॅम, जेलीकवठाचे औषधी उपयोग लक्षात घेऊन फळापासून विविध...
पोषणमूल्याने समृद्ध प्रथिनयुक्त बारबाजारामध्ये विविध प्रकारच्या प्रथिनयुक्त पावडर...
फळे,भाजीपाला साठवणीसाठी उच्च तापमानाचा...फळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...
फळांची जेली करताना...चमकदार, पारदर्शक, मऊ आणि उत्कृष्ट जेली...
आवळ्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती आपणा सर्वांना आहारात आणि आयुर्वेदात आवळ्याचे...
फळे,भाजीपाला प्रक्रियेची तत्त्वेफळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...
चिकूपासून टॉफी, जॅमनिर्मितीचिकू फळापासून टॉफी, जॅम, जेली, ज्यूस, गर (पल्प),...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
भाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीत-...काढणी, साठवणूक आणि प्रक्रिया यातील अयोग्य हाताळणी...
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
शेळीपालन : परतफेड हप्ते ठरवण्यासाठी ...शेळीपालनामुळे शेतमजूर स्त्रियांच्या उत्पन्नामध्ये...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
आवळ्याचे गुणकारी पदार्थआवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही,...
डाळनिर्मितीला भारतात मोठी संधीभारतातील एकूण गरजेपैकी ६० टक्के डाळ देशांतर्गत...
काथ्या उद्योगासाठी अनुदान आणि वितरणकाथ्या उद्योगात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत....
अन्नप्रक्रिया उद्योगात आहेत मुबलक संधीशेती व्यवसाय हा केवळ शेतमालाची उत्पादकता वाढवणे...
किवी फळापासून प्रक्रिया पदार्थकिवी फळ हे चॉकलेटी व हिरवे रंगाचे केसाळ, आंबट व...