अप्‍पर आयुक्त दर्जाच्या पदांची संख्या वाढवा, 'पणन'कडून शासनाला प्रस्ताव सादर

अप्‍पर आयुक्त दर्जाच्या पदांची संख्या वाढवा, 'पणन'कडून शासनाला प्रस्ताव सादर
अप्‍पर आयुक्त दर्जाच्या पदांची संख्या वाढवा, 'पणन'कडून शासनाला प्रस्ताव सादर

पुणे : शेतमाल पणन व्यवस्थेचा लाखो कोटी रुपयांचा गाडा हाकणाऱ्या पणन संचालनालयालाचा कारभार सातत्याने अतिरिक्त म्हणून दिला जात आहे. या पदावर पूर्णवेळ अधिकारी देण्यासाठी अप्‍पर आयुक्त दर्जाच्या पदांची संख्या वाढवा किंवा हे पद पदावनत करून अपर निबंधक करा, असा प्रस्ताव पणनकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. 

पणन संचालनालयातर्फे राज्यातील ३०७ बाजार समित्या आणि ९०० उपबाजारांवर नियंत्रण ठेवले जाते. या बाजार व्यवस्थेतून शेतमालाची दर वर्षी लाखो कोटींची उलाढाल होत असते. मात्र या विभागाचा अतिरिक्त कार्यभार अधिकाऱ्यांकडे दिला जात आहे. पणन संचालकपद सहकार विभागाच्या आस्थापनेवर असलेल्या अप्पर आयुक्त दर्जाचे आणि पणन विभागातील सर्वाच्च पद आहे. या पदासाठी राज्यात केवळ दोनच अधिकारी आहे. त्यांची नियुक्ती सहकार आयुक्तालयात आणि एक पणन संचालकपदी असते. मात्र या पदावर सातत्याने दुय्यम दर्जाचे किंवा अतिरिक्त कार्यभार दिलेला असतो. यामुळे पणन संचालक हे  कामाला न्याय देऊ शकत नसल्याने त्यांचा बाजार समित्यांवर वचक राहिलेला नाही.

दरम्यान, पणन सुधारणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न शासनाने यापूर्वी केला होता. रणजीतकुमार या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती चार वर्षांपूर्वी केली होती. मात्र त्यांनी पदभार न घेताच, राज्यपाल कार्यालयात नियुक्ती करून घेतली. नंतर पुणे विभागाचे विभागीय निबंधक दिपक तावरे यांची सनदी अधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर सरकारने त्यांची नियुक्ती केली. मात्र ही नियुक्तीदेखील औट घटकेची ठरली. पाच सहा महिने काम केल्यानंतर तावरे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यामुळे यापदाचा कार्यभार पुन्हा अतिरिक्त झाला.

सध्या अपर निबंधक (प्रशासन) डॉ. किशोर तोष्णीवाल यांच्याकडे पणन संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार असून, ते ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 

पणन संचालकपदी पवार की जोगदंड? 

नवीन पणन संचालकपदासाठी अपर आयुक्त असलेले डॉ. आनंद जोगदंड आणि विद्यमान प्रभारी सहकार आयुक्त सतीश सोनी हे पात्र आहेत. सोनी हे मुंबई बाजार समितीचे प्रशासक असून त्यांना मुदतवाढ मिळाली आहे आणि ते पणन संचालकपदासाठी फारसे इच्छुक नसल्याचे समजते. तर, डॉ. जोगदंड हे पणन संचालक असताना, त्यांची काही दिवसांतच अप्पर आयुक्तपदी बदली करण्यात आली. दुसरीकडे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या नावाचा प्रस्ताव सहकार आयुक्तालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आल्याचे बोलले जात असतानाच डॉ. जोगदंड यांच्याकडे पदभार देण्याचा आदेश मंत्रालयातून आल्याची चर्चा शुक्रवारी (ता. २९) होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com