Agriculture news in marathi Increase the number of pumps on demand in Jat taluka | Agrowon

जत तालुक्यात मागणीनुसार पंपांची संख्या वाढविणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

सांगली : ‘‘म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यात १३५ क्युसेकने सोडण्यात आले आहे. पाण्याची मागणी लक्षात घेऊन पंपांची संख्यादेखील वाढविण्याचा विचार सुरू आहे. त्याचे नियोजन सुरू केले आहे.

सांगली : ‘‘म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यात १३५ क्युसेकने सोडण्यात आले आहे. जत तालुका पूर्ण दुष्काळी असला, तरी मागणी असलेल्या भागातून प्राधान्यक्रम लावला आहे. पाण्याची मागणी लक्षात घेऊन पंपांची संख्यादेखील वाढविण्याचा विचार सुरू आहे. त्याचे नियोजन सुरू केले आहे,’’ अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू होऊन वीस ते पंचवीस दिवस झाले. सध्या या योजनेचे पाणी मुख्य कालव्यातूनच योजनेच्या शेवटच्या लाभक्षेत्राकडे जात आहे. योजनेचे पाणी पोटकालव्यांनी सोडले नाही. त्यामुळे जत तालुक्यात हे पाणी लवकर पोचले आहे. कुची येथून बोगद्यातून पाणी जत तालुक्याकडे जाते. त्यानुसार बोगद्यातून बाहेर आल्यानंतर हिवरे येथून जत तालुक्यातील पाण्याचा प्रवास सुरू होतो. हिवरे, बागेवाडी हद्द ओलांडून पाणी सध्या कुंभारी येथील तलावात सोडले जात आहे.

कुंभारी येथील दोन्ही तलावातील पाण्याबाबत मागणी यापूर्वीच आली असल्याने पाणी सोडण्यात येत आहे. त्यांनतर पुढे जत नगरपालिका मागणी व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश यानुसार बिरनाळ तलावातही लगेच पाणी सोडण्यात येणार आहे.

जत तालुक्यात पाणी सोडले असले, तरी अद्याप मिरज तालुक्यातील डोंगरवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी, तासगाव तालुक्यातील विस्तारित गव्हाण व मूळ गव्हाण या उपसासिंचन योजना सुरू केल्या नाहीत. पण, या सर्व योजना दोन दिवसांनंतर म्हैसाळ योजनेच्या मागील पाच टप्प्यांतील पंप संख्यावाढीबरोबर सुरू करण्यात येतील, असेही सूत्रांनी सांगितले. 

पाण्याचा वेग १५० ते २०० क्युसेक

म्हैसाळ योजनेच्या पाचही टप्प्यांतील पंपसंख्या वाढविण्याबाबत मेकॅनिकल विभागासोबत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पंपसंख्या वाढविण्यासह जत तालुक्यात सध्या १३५ क्युसेक असलेला पाण्याचा वेग १५० ते २०० क्युसेक करण्यासाठी नियोजन करण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा ...मुंबई: दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा...
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...