Agriculture news in Marathi, Increase in number of tankers in Nagar districts | Agrowon

नगर जिल्ह्यामध्ये टॅंकरच्या संख्येत पुन्हा वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नगर ः जिल्ह्यात अद्यापही बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नाही. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. रेकॉर्डब्रेक ८७३ च्या तुलनेत टॅंकरची संख्या घटली असली, तरीही जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात ३८६ टॅंकर सुरू आहेत. दक्षिणेत सर्वांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, ३७७ पर्यंत घटलेली संख्या पुन्हा ३८६ गेली आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले असले, तरी अजूनही टॅंकर सुरू आहेत. तब्बल ३८६ टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची आतापर्यंतची नगर जिल्ह्यामधील ही पहिलीच वेळ आहे. 

नगर ः जिल्ह्यात अद्यापही बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नाही. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. रेकॉर्डब्रेक ८७३ च्या तुलनेत टॅंकरची संख्या घटली असली, तरीही जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात ३८६ टॅंकर सुरू आहेत. दक्षिणेत सर्वांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, ३७७ पर्यंत घटलेली संख्या पुन्हा ३८६ गेली आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले असले, तरी अजूनही टॅंकर सुरू आहेत. तब्बल ३८६ टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची आतापर्यंतची नगर जिल्ह्यामधील ही पहिलीच वेळ आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या गंभीर झळा बसत आहेत. यंदा उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्याची टंचाईची तीव्रता अधिक गंभीर होती. दुष्काळाच्या तीव्रतेमुळे यंदा जूनपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या पावणेनऊशेपर्यंत गेली होती. तोही नगर जिल्ह्यामधील टॅंकरचा उच्चांकच होता. पावसाळा सुरू झाल्यानंतर टॅंकरची संख्या घटली होती. मात्र, अजूनपर्यंत अनेक भागांत पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे टंचाई गंभीर आहे. त्यामुळेच नगर जिल्ह्यामध्ये ३५७ गावे व दोन हजार १०२ वाड्यावस्त्यांवरील सात लाख ४२ हजार ६४८ नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाद्वारे ३८६ टॅंकरने दररोज पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यामध्ये यंदा अल्प पाऊस पडल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ लागली. टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा, यासाठी प्रशासनाकडे टॅंकरची मागणी करणाऱ्या प्रस्तावांच्या संख्येत वाढ होऊ लागली. सध्या श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले वगळता राहाता, नेवासे, संगमनेर, राहुरी, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदे या अकरा तालुक्यांतील गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये सर्वांत जास्त जामखेड तालुक्‍यात ८८ टॅंकर सुरू आहेत, सर्वांत कमी राहुरी तालुक्‍यात एक टॅंकर सुरू आहे. 

शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. टॅंकर सुरू करण्याचे अधिकार सुरवातीला जिल्हाधिकारी स्तरावर होते. परंतु, निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन सरकारकडून टॅंकर मंजुरीचे अधिकार डिसेंबरच्या सुरवातीस उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. 

समाधानकारक पाऊस नसल्याने टॅंकरची संख्या झपाट्याने वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पावसाळ्याचे अडीच महिने उलटल्यानंतरही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची आतापर्यंतची नगर जिल्ह्यामधील ही पहिलीच वेळ आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...