पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी पाणीसाठ्याची वाढ

पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मॉन्सूनोत्तर पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने जोर ओसरला आहे. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील धरणांत १९७.५८ टीएमसी पाणीसाठा होता. तर शुक्रवारी सकाळपर्यंत त्यात वाढ होऊन १९८.९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.
Increase for one TMC of water in dams in Pune district
Increase for one TMC of water in dams in Pune district

पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मॉन्सूनोत्तर पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने जोर ओसरला आहे.  बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील धरणांत १९७.५८ टीएमसी पाणीसाठा होता. तर शुक्रवारी सकाळपर्यंत त्यात वाढ होऊन १९८.९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणांतील पाणीपातळीत जवळपास एक टीएमसीपर्यत वाढ झाली. यामध्ये उजनी, कळमोडी आणि चासकमान ही तीन धरणे पुन्हा शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित धरणांतही पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली.

शुक्रवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंत ढगाळ हवामान असले, तरी धरणक्षेत्रात पावसाच्या तुरळक सरी पडल्याची नोंद झाली. सर्वच भागांत पावसाने चांगलीच उघडीप दिली. शनिवारी (ता. ४)देखील ढगाळ वातावरण कायम राहिले.

गेले दोन ते तीन दिवस जिल्ह्यांच्या भीमा खोऱ्यातील २६ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. जवळपास १२७ मिलिमीटरपर्यंत पाऊस पडला. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत पावसाचा जोर राहिला. त्यामुळे ओढे व नाल्यातील कमी झालेल्या पाण्याचा प्रवाह पावसामुळे पुन्हा वाढला. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले. 

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांतून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच जिल्ह्यातील काही तालुक्यांना सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. शुक्रवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंत उजनी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन मिलिमीटर पाऊस पडला. 

वडज, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, आंध्रा, पवना, वरसगाव, पानशेत, वीर, नाझरे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात एक ते दोन मिलिमीटर पाऊस पडला. पावसामुळे कांदा, द्राक्षे, डाळिंब, भात, ज्वारी पिकांचे चांगलेच नुकसान झाले. भाजीपाला पिकांनाही चांगलाच दणका बसल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com