Agriculture News in Marathi Increase in online warehouse mortgage loan | Page 4 ||| Agrowon

  वखारच्या ऑनलाइन शेतीमाल तारण कर्जात वाढ 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन) शेतीमाल तारण कर्जाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. गेल्या १५ दिवसांत दीड कोटींचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले असून, या हंगामात ७१० शेतकऱ्यांनी सुमारे १४ कोटी १९ लाख रुपयांचे तारण कर्ज घेतले आहे.

पुणे : राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन) शेतीमाल तारण कर्जाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. गेल्या १५ दिवसांत दीड कोटींचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले असून, या हंगामात ७१० शेतकऱ्यांनी सुमारे १४ कोटी १९ लाख रुपयांचे तारण कर्ज घेतले आहे. तर सर्वसाधारण तारण कर्जात ४ हजार १७७ शेतकऱ्यांनी सुमारे १३४ कोटींचे कर्ज घेतले आहे. अशी माहिती वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक दीपक तावरे यांनी दिली. 

गेल्या पंधरा दिवसांत (८ नोव्हेंबरअखेर) सर्वसाधारण तारण कर्ज सुमारे १२५ कोटींचे होते. यामध्ये वाढ होऊन आता २३ नोव्हेंबर अखेर १३४ कोटी ४१ लाखांचे कर्ज देण्यात आले आहे. तर वखार महामंडळाच्या नावीन्यपूर्ण ऑनलाइन (ब्लॉकचेन) तारण कर्ज योजनेला देखील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून, गेल्या पंधरा दिवसांत दीड कोटींचे अधिकचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे ऑनलाइन कर्जाचा टप्पा १४ कोटी १९ लाख रुपयांपर्यंत गेला आहे. तर शेतकरी संख्या ७१० एवढी झाली आहे. 

विभागनिहाय ऑनलाइन (ब्लॉकचेन) कर्जवाटप आणि शेतकरी संख्या 
जिल्हा --- शेतकरी --- कर्ज (रुपयांमध्ये) 
अमरावती --- १०८ --- १ कोटी ८२ लाख १४ हजार ३२ 
औरंगाबाद --- १६ --- ३० लाख ९७ हजार ३७६ 
कोल्हापूर --- ९ ---१० लाख ४६ हजार 
लातूर --- ४६६ --- ९ कोटी ९३ लाख ८१ हजार २३१ 
नागपूर --- ४९ --- ८८ लाख ७ हजार ४२८ 
नाशिक --- २३ --- ४५ लाख ३१ हजार १०१ 
पुणे --- ३९ --- ६८ लाख ४६ 

ऑनलाइन कर्जाची शेतमालनिहाय आकडेवारी 
शेतीमाल --- शेतकरी संख्या --- कर्जाची रक्कम 
हळद --- २१८ --- ५ कोटी १४ लाख 
सोयाबीन --- २५१ --- ३ कोटी ९१ लाख 
चना --- १३४ --- २ कोटी ९२ लाख 
तूर --- ५८ --- १ कोटी ४३ लाख 
धान --- २२ --- ३१ लाख ४८ हजार 
मूग --- ७ --- १४ लाख ८३ हजार 
मका --- ४ --- ८ लाख १९ हजार 
लागवडीयोग्य बियाणे --- १ --- ७ लाख ५० हजार 
ज्वारी --- ७ --- ६ लाख ८६ हजार 
वाटाणा --- २ --- ४ लाख २४ हजार 
भुईमूग --- १ --- २ लाख ५० हजार 
उडीद --- २ -- १ लाख १३ हजार 
तीळ --- १ -- ७५ हजार 
गहू --- २ --- १५ हजार 

एकूण शेतकरी --- ७१० -- १४ कोटी १९ हजार ४४ 
 


इतर बातम्या
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
वीज प्रश्नांवर मार्ग काढू : भुजबळनाशिक : ‘‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
जळगाव, अमळनेर, चोपडा बाजारात मक्याचे दर...जळगाव ः  जिल्ह्यातील जळगाव, चोपडा व...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
मनमाडमध्ये वाढत्या थंडीमुळे दूध...मनमाड, ता. नांदगाव : गेल्या काही दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जाची मर्यादा...सोलापूर ः शेतीचे अपेक्षित उत्पन्न आणि हवामानाचा...
जळगावात ‘वाळू माफियाराज’जळगाव ः जिल्ह्यात विशेषतः जळगाव तालुक्यातील सर्वच...
जळगाव जिल्ह्यात ओल्या दुष्काळाच्या...जळगाव ः  अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे...
दुधाला भाव व बाजारपेठ मिळवून देणार :...वर्धा : ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था ही...
कोल्हापूर : ‘एफआरपी’चा वाढीव रक्कम न...कोल्हापूर : गेल्या हंगामात तोडणी वाहतूक खर्च कमी...
अकोलाः करपा रोगाचा केळीला फटका पणज, जि. अकोलाः जिल्ह्यात पणज, बोचरा, शहापूर,...
नागपूर : महाज्योतीमार्फत करडईचे ५०...नागपूर : ‘‘महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
भारताच्या फिर्यादीस ऑस्ट्रेलियाकडून...देशांतर्गत ऊस आणि साखर उत्पादकांना करण्यात...