जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवा...

सेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय पदार्थांची जलधारण शक्ती जास्त असल्यामुळे सेंद्रिय पदार्थयुक्त जमिनी पाणी जास्त काळ शोषून ठेवतात. सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि इतर पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय पदार्थामधून होत असतो.
Organic curb is important for soil fertility. green manures are beneficial for this
Organic curb is important for soil fertility. green manures are beneficial for this

सेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय पदार्थांची जलधारण शक्ती जास्त असल्यामुळे सेंद्रिय पदार्थयुक्त जमिनी पाणी जास्त काळ शोषून ठेवतात. सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि इतर पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय पदार्थामधून होत असतो. निसर्गातील सर्व सजीवांना जगण्यासाठी पोषणाची गरज असते. पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन वनस्पतीवर अवलंबून आहे. कारण केवळ वनस्पतीच स्वत:चे अन्न स्वत: तयार करू शकते. वनस्पतींना जगण्यासाठी जमीन गरजेची असते.परंतु जमिनीच्या बाबतीत आपण दुर्लक्ष करत आहोत. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ व सूक्ष्मजीव या घटकाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. सेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजिवांचे अन्न आहे. त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजिवांचे प्रमाण जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर अवलंबून असते. सेंद्रिय कर्बाचे महत्व

  • सेंद्रिय कर्ब टिकण्यासाठी जमीन मशागतीचा प्रकार, पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, सेंद्रिय पदार्थांचा वापर व पुनर्चक्रीकरण या सर्व घटकांचा समावेश होतो.
  • जमिनीतून उत्पादित १/३ भागाचे पुनर्चक्रीकरण झाले पाहिजे. सतत एकाच पीक पध्दतीचा वापर देखील सेंद्रिय कर्ब कमी होण्यास कारणीभूत ठरतो.
  • तापमान वाढीमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन होत आहे. त्यामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्‍साईडचे प्रमाण वाढत आहे.
  • दिवसेंदिवस जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे.२०१५-१६ मध्ये केलेल्या माती परीक्षणामध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६ वरून ०.३ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वसाधारणपणे मातीमध्ये १ टक्का किंवा त्याहून जास्त सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असायला हवे.
  • सेंद्रिय पदार्थ हे जमिनीतील जिवाणूंचे अन्न आहे. पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी जिवाणूंची गरज असते.
  • सेंद्रिय पदार्थांची जलधारण शक्ती जास्त असल्यामुळे सेंद्रिय पदार्थयुक्त जमिनी पाणी जास्त काळ शोषून ठेवतात. सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि इतर पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय पदार्थामधून होत असतो.
  • एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन  जमिनीच्या आरोग्याची सांगड गुणधर्माशी जोडलेली असते. उदा. सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान, क्षारांचे प्रमाण कमी, सेंद्रिय कर्ब १ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, चुनखडीचे प्रमाण ५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, १ चौ.मी. जमिनीमध्ये कमीत कमी १ गांडूळ, पाण्याचा निचरा होणारी, क्षारयुक्त किंवा चोपण नसलेली, योग्य त्या सर्व अन्नद्रव्याचा समतोलपणे पुरवठा करणारी, पाणी आणि हवेचे योग्य प्रमाण असणारी, भरपूर जिवाणूंनी युक्त असलेली जमीन म्हणजे चांगली आरोग्य असलेली जमीन.

  • सर्व अन्नद्रव्यांचा एकत्रित पुरवठा होतो.
  • हळूवार व पिकानुरूप दीर्घकाळ अन्न पुरवठा होत राहतो.
  • जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.
  • जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्माची सुधारणा होते.
  • जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची जोपासना होते.
  • जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकविली जाते.
  • सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी उपाययोजना 

  • कमी मशागत व सपाटीकरण करावे.
  • मृद व जलसंधारण करून जमिनीची धूप टाळावी.
  • आंतर पीक व पीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा.
  • जमिनीवर आच्छादनाचा (ऊस पाचट, गव्हाचा भुसा) वापर करावा.
  • पिकांचे अवशेष (पिकांचे १/३ भाग) न जाळता जमिनीत गाडावेत.
  • भर खतांचा (शेणखत/कंपोस्ट/गांडूळ खत) व हिरवळीच्या खतांचा ( धैंचा, गिरीपुष्प) नियमित वापर करावा.
  • शेती बांधावर वारा गतिरोधक तसेच गिरीपुष्प व हिरवळीची पिके लावावीत.
  • शेतीला पशुपालनाची जोड द्यावी.
  • संपर्क - डॉ.हरिहर कौसडीकर,९४२३१४२२१० (संचालक (शिक्षण) महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद,पुणे )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com