खानदेशात कांदा पिकाच्या लागवड खर्चात वाढ

जळगाव ः खानदेशात प्रतिकूल स्थितीमुळे खरिपातील कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले. यामुळे कांदा रोपे महागली आहेत. लागवडीचे नियोजन कोलमडत आहे. लागवड कमी होताना दिसत आहे.
 Increase in planting cost of onion crop in Khandesh
Increase in planting cost of onion crop in Khandesh

जळगाव  ः खानदेशात प्रतिकूल स्थितीमुळे खरिपातील कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले. यामुळे कांदा रोपे महागली आहेत. लागवडीचे नियोजन कोलमडत आहे. लागवड कमी होताना दिसत आहे. दुसरीकडे  रब्बीत लागवडीच्या कांद्याचे बियाणेदेखील महागले आहे. प्रतिकिलो ३००० रुपयांपर्यंतचे दर कांदा बियाण्याचे आहेत. यामुळे कांदा लागवडीचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे.

खरिपात खानदेशात १६ ते १७ हजार हेक्टरवर कांदा लागवडीची अपेक्षा होती. ही लागवड धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारमधील शहादा, जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, मुक्ताईनगर आदी भागात होईल, असे चित्र होते. कांदा रोपवाटिका मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या सुरवातीला तयार करण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली. परंतु, जून व नंतर जुलैमध्ये तीव्र ऊन होते. कांदा रोपांचे अतिउष्णतेत नुकसान झाले.

अतिजोरदार पावसाने पेरलेल्या बियाण्यांचे काहिसे नुकसानही अनेक भागात झाले. यामुळे कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले.  अनेक शेतकरी कांदा रोपे निर्मिती व विक्रीचा व्यवसाय करतात. कांदा लागवडीसाठी सध्या हवी तशी व पुरेशी रोपे नाहीत. 

चार एकर क्षेत्रासाठी कांदा रोपवाटिका तयार केली, पण फक्त दोन एकर क्षेत्रासाठी रोपे तयार होवू शकली, अशी स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांना कांदा रोपे रोपवाटिका व्यावसायिकांकडून खरेदी करावी लागत आहेत. रोपांची तुटवडा असल्याने व्यावसायिक मंडळी एक, दीड किलो बियाण्याच्या दर्जेदार रोपांसाठी २५ ते २६ हजार रुपये दर घेत आहेत. 

लागवडीकडे कल वाढला

कांद्याला जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातून मुक्त केले आहे. तसेच अलीकडे हॉटेल्स, खानावळी सुरू होत असल्याचे लक्षात घेता कांद्याची मागणी पुढे वाढेल, असे दिसत आहे. यामुळे अनेक शेतकरी कांदा लागवडीसाठी सरसावले आहेत. यामुळे कांदा रोपांचा तुटवडा खानदेशात आहे. कांदा लागवड परवडत नाहीत. त्यात पुढे दर टिकून राहतील का, हादेखील प्रश्‍न आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com