नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढ

दोन सप्ताहापूर्वी डाळिंबाची आवकेची नोंद ७७४४ क्विंटल झाली होती. त्यावेळी मृदुला वाणास २५० ते ७००० तर सरासरी ४५०० रुपये दर मिळाला होता. क्विंटलमागे २५०० हजार रुपयांची घसरण दिसून आली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Pomegranate prices continue to fall in Nashik
Pomegranate prices continue to fall in Nashik

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबाची आवक १२,४२६ क्विंटल झाली. गेल्या तीन सप्ताहाच्या तुलनेत आवक वाढती असल्याचे दिसून आली. दोन सप्ताहापूर्वी डाळिंबाची आवक ९,४७७ क्विंटल झाली होती. गत सप्ताहात २९४९ क्विंटलची वाढ दिसून आली. मृदुला वाणास १५०० ते २५०० तर सरासरी २००० रुपये दर मिळाला. दोन सप्ताहापूर्वी डाळिंबाची आवकेची नोंद ७७४४ क्विंटल झाली होती. त्यावेळी मृदुला वाणास २५० ते ७००० तर सरासरी ४५०० रुपये दर मिळाला होता. क्विंटलमागे २५०० हजार रुपयांची घसरण दिसून आली, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये उन्हाळी कांद्याची आवक १२,८४४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८३० ते २१०० तर सरासरी दर १८०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५६६० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५० ते १४०० तर सरासरी दर १०५० रुपये राहिला. लसणाची आवक १८१ क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल ५७०० ते १०००० तर सरासरी दर ८००० रुपये राहिला. आद्रकची आवक १२०६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ४००० तर सरासरी दर ३५०० रुपये राहिला.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले.वालपापडी-घेवड्याची आवक ३७१६ क्विंटल झाली.वालपापडीला प्रतिक्विंटल ४५०० ते ५००० असा तर सरासरी दर ४७०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ४००० ते ५५०० तर सरासरी दर ५००० रुपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक १८३९ क्विंटल झाली. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने दर स्थिर होते. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० तर सरासरी दर २५०० रुपये राहिला. गाजराची आवक ६१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० तर सरासरी दर २५०० रुपये राहिला.फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ७५ ते ३०० तर सरासरी १७५, वांगी १५० ते ३१५ तर सरासरी २२० व फ्लॉवर ५० ते १६० सरासरी १०० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले.

भाजीपाला प्रति १०० जुड्यांचा दर
पालेभाजी किमान कमाल सरासरी
कोथिंबीर गावठी  १००० ४३०० ३०००
कोथिंबीर हायब्रीड ८०० ८१०० ६०००
मेथी १५०० ४००० ३०००
शेपू ७०० १४०० १०००
कांदापात २००० ४९०० ३८००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com