हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात वाढ

हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात वाढ
हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात वाढ

पुणे ः गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या बाजार आवारात मकर संक्रांतीनंतर भाजीपाल्याची आवक घटली आहे. रविवारी (ता. २७) मार्केट यार्डात १४० ते १५० ट्रक आवक झाली. आवक घटल्याने हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात दहा ते वीस टक्के वाढ झाली. तर इतर भाजीपाल्यांचे स्थिर होते. 

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथुन सुमारे ३ ते ४ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, राजस्थानमधून १२ ट्रक गाजर, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून २० ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधून कोबी १० ते १२ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरात मधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतील झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० गोणी, टॉमेटोे सुमारे साडेचार हजार क्रेट, कोबी  व फ्लॉवर प्रत्येकी ८ ते १० टेम्पो, भेंडी १० टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, पावटा ७ ते ९ टेम्पो, गावर ३ ते ४ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो इतकी आवक झाली होती. तर जुन्या, नव्या कांद्याची सुमारे १०५ ट्रक आवक झाली होती. तसेच  स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची  ४० ते ४५ ट्रक आवक झाली. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :  कांदा : जुना ३०-६०, नवा ५०-७०, बटाटा : ९०-१३०, लसूण : ८०-२५०, आले : सातारी  ५२०-५८०, भेंडी : ३५०-४५०, गवार : ५००-६००, टोमॅटो : १५०-१८०, दोडका : ३५०-४५०, हिरवी मिरची : ४००-५००, दुधी भोपळा : १४०-१८०, चवळी : २००-२५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी ४००, पांढरी ३००, पापडी : १५०- २००, पडवळ : १५०-१८०, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : ८०-१००, वांगी : २००-३००, डिंगरी : २००-२५०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १५०-२००, शेवगा : ३००-४००, गाजर : १००-१३०, वालवर : १४०-१८०, बीट : १००-१२०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १५०-२००, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : ३००-३५०, पावटा : २४०-२५०, भुईमूग शेंग : ४५०-५५०, मटार : परराज्य  ६०-१८०, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : २२०-२४०, मका  कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे २ लाख तर मेथीची सुमारे एक लाख जुड्या आवक झाली. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २००-५००, मेथी :  २००-४००, शेपू : ४००-७००, कांदापात : ५००-७००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-७००, चवळई : ४००-५००, पालक : ४००-६००, हरभरा गड्डी : ५००-६००.

फळबाजारात रविवारी (ता. २०) मोसंबी सुमारे ६० टन, संत्री १२ टन, डाळिंब सुमारे २०० ते २२५ टन, पपई २० ते २५ टेम्पो, लिंबे सुमारे तीन हजार गोणी, चिक्कू २ हजार बॉक्स आणि गोणी, पेरू २५० क्रेट, कलिंगड २५ ते ३० टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे ४०० ते ५०० गोणी, विविध द्राक्षांची सुमारे ४० टन आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे :  लिंबे (प्रति गोणी) : ५०-२५०, अननस (डझन) : ७०-२५०, मोसंबी : (३ डझन) : १००-३८०, (४ डझन ) : ३०-१८०, संत्रा : (३ डझन) : १५०-३००, (४ डझन ) : ८०-१६०, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१००, गणेश ५-२०, आरक्ता १०-५०. कलिंगड : ३-८, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : १००-६००, पेरू (२० किलो) : ५००-६००, सफरचंद : सिमला (२५ किलो) १२००-१८००, किन्नोर (२५ किलो) १८००-२५००, काश्मीर डेलिशिअस (१५ किलो) १०००-१४००, संत्री : किन्नू (१० किलो ) २८०-३५०, बोरे : चेकनट (१० किलो) ६५०-७००, उमराण (१० किलो) ८०-११०, चमेली (१० किलो) १८०-२२०, चण्यामण्या ४२०-४७०. द्राक्षे : तास-ए-गणेश (१५ किलो) ६००-६५०, जम्बो (१० किलो) ५००-७५०, सुपर सोनाका (१५ किलो) ८००-१०५०, शरद (१५ किलो) ७००-९५०, माणिकचमन (१५ किलो) ५००-५५०, स्ट्रॉबेरी : ८०-१५०.

फूल बाजार फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-६०, गुलछडी : ८०-१५०, बिजली : ३०-५०, कापरी : २०-४०, कागडा : ६००-८००, मोगरा : ७००-१०००, ॲस्टर : १०-१५, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : २०-४०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : १००-१६०, लिली बंडल : ५-१०,  जरबेरा - २०-४०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती : ८०-१२०.

मासळीबाजार थंडीमुळे मासेमारी घटली आहे. परिणामी, मासळीची कमी प्रमाणात आवक होत आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात सुमारे ५ ते १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोलसमुद्रातील मासळीची ८ ते १० टन, खाडीच्या मासळीची ३०० ते ४०० किलो, नदीच्या ५०० ते ७०० किलो मासळीची इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १० ते १२ टन इतकी आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) :  पापलेट : कापरी : १७००-१८००, मोठे १५००-१६००, मध्यम : ११००-१२००, लहान ८००-९०० भिला : ६००-७००, हलवा : ६५०-७००, सुरमई : ७००-७५०, रावस-लहान : ६००-६५०, मोठे ७५०-८५०, घोळ : ६००, करली :३२०, करंदी (सोललेली) : ३६०, भिंग ४४०, पाला : लहान ७००, मोठे : १२००, वाम : ६५०- ७५०, ओले बोंबील : लहान १६०-१८०. कोळंबी : लहान :३२०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स : ६००, किंगप्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १५००, मोरी : लहान ३२०, मोरी ३२०, मांदेली : १२०, राणीमासा : २००-२५०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ५००-६००. 

खाडीची मासळी  सौंदाळे : ३००-४००, खापी २४०, नगली : लहान २८० मोठी ५५०, तांबोशी ४४० पालू : २८०, लेपा : लहान १६०, मोठे २८०, शेवटे : २४० बांगडा : लहान १८०, मोठा २४०, पेडवी : ६०, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : २००, खुबे १६०, तारली : १८०-२००. 

नदीची मासळी  रहू : १६०, कतला : १८०, मरळ : लहान ३६०, शिवडा : २४०, खवली : २४०, आम्ळी : १८० खेकडे : २४०, वाम : ६००.

मटण  बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.

चिकन चिकन : १५०, लेगपीस : १८०,जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. अंडी : गावरान : शेकडा : ७८०, डझन : १०० प्रति नग : ८.५ इंग्लिश : शेकडा : ६४४ डझन : ६० प्रतिनग : ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com