पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या दरात वाढ

पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार, रविवारच्या सलग दोन दिवसांच्या बंद असलेल्या पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २६) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाची सुमारे ७० ट्रक आवक झाली.
Increase in the price of Simla Chili, green chillies in Pune
Increase in the price of Simla Chili, green chillies in Pune

पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार, रविवारच्या सलग दोन दिवसांच्या बंद असलेल्या पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २६) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाची सुमारे ७० ट्रक आवक झाली. सरासरी आवकेच्या ही आवक २० ते ३० ट्रकने कमी आहे. मागणी आणि पुरवठा सुरळीत असल्याने विविध भाजीपाल्याचे दर स्थिर होते. मात्र सिमला मिरची, हिरवी मिरची, मटार यांची आवक तुलनेने कमी झाल्याने दरात वाढ झाली.

कोरोना टाळेबंदीत गर्दी रोखण्याच्या विविध उपाययोजनांसह चक्राकार पद्धतीने सुरु असलेल्या बाजार समितीमध्ये  सोमवारी (ता. २६) परराज्यांतून आलेल्या आवकेमध्ये हिमाचल प्रदेशातून सुमारे २ ट्रक मटार, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ५ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ट्रक, तमिळनाडू येथून ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची ५ ट्रक आवक झाली होती. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे २०० पोती आवक झाली होती. चक्राकार पद्धतीमध्ये आले आडतदारांचे गाळे एकाच वेळी बंद असल्याने आवकेत घट झाली. तर कोबी ४ टेम्पो, फ्लॉवर ८ टेम्पो, सिमला मिरची ५ टेम्पो, भेंडी ३ तर गवार २ टेम्पो, तांबडा भोपळा ५ टेम्पो, टॉमेटो ५ हजार क्रेट, मटार २० गोणी, गाजर ३ टेम्पो, भुईमूग ३० गोणी, तर कांदा ५० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून २५ ट्रक, तर गावरान कैरी ३ टेम्पो आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : ९०-१२०, बटाटा : १००-१४०, लसूण : ३००-६००, आले : सातारी १००-१५०, भेंडी : २००-३००, गवार : १५०-३००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : ४००-६००, दुधी  भोपळा : ८०-१००, चवळी : १५०-२००, काकडी :  ६०-१००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १८०-२००, पापडी : ३००-३५०, पडवळ : १००-२००,  फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ६०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : १००-२००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २५०-३५०, तोंडली : कळी  २००-२५०, जाड : ६०-१२०, शेवगा : ८०-१५०, गाजर : १००- २०० वालवर : ३००-३५०, बीट : ८०-१२०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१००, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-२२०, पावटा : ३५०-४००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : स्थानिक -७००-८००, परराज्य -९००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, तोतापुरी  कैरी - १५०-२००, गावरान - १००-१५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) :  १०००-१६००. 

तीन अडत्यांवर कारवाई 

बाजार आवारात कर्नाटक येथून येणारा ‘आंबा’ कोकणातील ‘देवगड हापूस’ या नावाने विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी बाजारातील तीन अडत्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये एच.बी बागवान शेड नं.२, नॅशनल फ्रूट शेड नं.३, लोकमल नारायणदास पंजाबी शेड नं.४ या तीन अडत्यांकडून १७ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com