Agriculture news in Marathi, Increase prices of brinjal in Pune | Agrowon

पुण्यात वांगी, घेवडा, शेवग्याच्या दरात वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रविवारी (ता. २४) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर असून, काही भाजीपाल्यांची मागणी वाढल्याने दर १० ते २० टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये वांगी, घेवडा आणि शेवग्याच्या दरात वाढ झाली आहे. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. 

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रविवारी (ता. २४) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर असून, काही भाजीपाल्यांची मागणी वाढल्याने दर १० ते २० टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये वांगी, घेवडा आणि शेवग्याच्या दरात वाढ झाली आहे. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. 

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ४ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा अवघा सुमारे २५ ते ३० गोणी, कर्नाटक येथून घेवडा ४ टेम्पो, राजस्थानातून ५ ट्रक गाजर, हिमाचल आणि पंजाब येथून मटार सुमारे १२ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सुमारे सहा हजार गोणी, आग्रा आणि इंदूर येथून बटाटा सुमारे बटाट्याची सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. 

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १२०० पोती, टॉमेटो सुमारे सहा हजार क्रेट, काकडी १० टेम्पो, भेंडी १० टेम्पो, गवार ५ टेम्पो, फ्लॉवर कोबी प्रत्येकी १० टेम्पो, भुईमूग सुमारे ५० पोती, ढोबळी मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, पावटा २ टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, जुना आणि नवीव कांदा प्रत्येकी सुमारे ४० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : नवीन ३००-६००, जुना : ८०० ते ९००, बटाटा : १००-१५०, लसूण : १०००-१८००, आले : सातारी ३००-५००, भेंडी : २००-२५०, गवार : ४००-६००, टोमॅटो : १००-१५०, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : १००-२२०, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : २५०-३००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी: २००-२५०, पापडी : २५०-३००, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : १५०-२००, वांगी : ४००-६००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : १४०-१५०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ३००-४००, जाड : १००-१२०, शेवगा : १०००-१५००, गाजर : ५००-५५०, वालवर : ३००-४००, बीट : १३०-१४०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२५०, पावटा : ४००-५००, भुईमूग शेंग : ५५०-६००, मटार : परराज्य ५००-७००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या 
पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता. २४) कोथिंबिरीची सुमारे २ लाख, तर मेथीची सुमारे ३० हजार जुड्यांची आवक झाली होती. 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : १५००-२०००, शेपू : १२००- १५००, कांदापात : १५०० - ३०००, चाकवत : ८००-१०००, करडई : ९००-१०००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : १०००-१२००, मुळे : १०००- १५००, राजगिरा : ८००-१०००, चुका : ८००-१०००, चवळई : १५००-१८००, पालक : ८००-१०००. 

फुले 
लग्नांचा हंगाम सुरू झाल्याने शोभिवंत फुलांना वाढलेली मागणी कायम असल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : ४०-८०, कापरी : २०-४०, शेवंती : ३०-५०, अ‍ॅस्टर : १५-२५, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ३०-६०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : १३०-२००, लिली बंडल : १५-२०, जरबेरा : ६०-१००, कार्नेशियन - १००-१८०.

फळबाजार
रविवारी (ता. २४) येथील बाजारात मोसंबी सुमारे ३५ टन, संत्री ७ टन, डाळिंब सुमारे ३०० टन, कलिंगड १५ टेम्पो, खरबूज १२ टेम्पो, पपई २५ टेम्पो, लिंबे सुमारे ४ हजार गोणी, पेरू ८०० क्रेटस, चिकू ३०० डाग, सफरचंद सुमारे ८ हजार बॉक्स, विविध जातींची बोरे सुमारे ६०० गोणी, तर सीताफळाची ८ टन आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १००-२००, मोसंबी : (३ डझन) : ३२०-६००, (४ डझन) : १८०-३००, संत्रा : (३ डझन) : १५०-३८०, (४ डझन) : ८०-१५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश : ५-२०, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-२०, खरबूज : १०-२५, पपई : ५-२५, चिकू : ७००-१०००, सीताफळ : २०-१२५, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) १८००-२५००, किन्नोर : २४००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ८००-१४०० बोरे (१० किलो) : चेकनट : ५५०-६००, उमराण : १२०-१४०, चमेली : २२०-२५०, चण्यामण्या : ४००-५५०.

मासळी बाजार
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २४) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची सुमारे २०० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे दीड टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तर उद्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू होत असल्याने मागणी वाढली होती. मात्र, आवकदेखील जास्त असल्याने मासळीचे दर स्थिर होते. 

दरम्यान थंडीमुळे गावरान अंड्याला मागणी वाढल्याने शेकड्याच्या दरात ६० रुपयांनी वाढ झाली होती. तर चिकन आणि इंग्लिशच्या अंड्याचे दर स्थिर होते. तर मटणाच्या दरात थोडी वाढ झाली होती.

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) : 

पापलेट : कापरी : १५००, मोठे १५००, मध्यम : ८००-९००, लहान ६०० भिला :४५०, हलवा : ४८०- ५५०, सुरमई : ४८०-५५०, रावस : लहान ५५०, मोठा ७५०, घोळ : ६००, भिंग : २८०, करली : २४०-२८०, करंदी : ३६०, पाला : लहान ८००, मोठे - ११००-१२००, वाम : लहान पिवळी  ४८०-७५०, काळी : ४००, ओले बोंबील : १२०-१६०, 

कोळंबी 
लहान २८०-३२०,  मोठे ४८०, जंबोप्रॉन्स : १५००-१६००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान २००, मोठे २८०, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ५००- ५५०. 

खाडीची मासळी 
सौंदाळे : २००, खापी : २००, नगली : लहान २४०, मोठे ७५०, तांबोशी : ४००, पालू : २४०, लेपा : १४०, मोठे २४०-२८०, शेवटे : २४०, बांगडा : लहान २००, मोठे २४०-२८०, पेडवी : ८०-२८०, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १४०. 

नदीची मासळी 
रहू : १४०- १६०, कतला : १४०-१६०, मरळ : ४००, शिवडा : २४०, चिलापी : ८०-१००, खवली : २४०-२८०, आम्ळी : १२०, खेकडे : २४० वाम : ६००. 

मटण 
बोकडाचे : ५६०, बोल्हाईचे : ५६०, खिमा : ५६०, कलेजी : ६२०. 

चिकन 
चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 

अंडी 
गावरान : शेकडा : ८०० डझन : १०८ प्रति नग : ९, इंग्लिश : शेकडा : ४६७ डझन : ६६ प्रतिनग : ५.५


इतर बाजारभाव बातम्या
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात तूर ४१०० ते ५५०० रुपये...नांदेडमध्ये प्रतिक्विंटल४५५० ते ४७०० रुपये...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात बटाटा ८०० ते १८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
पुण्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत कांदा १००० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात द्राक्ष प्रतिक्विंटल १५०० ते...परभणीत ५४०० ते ७००० रुपये परभणी येथील पाथरी...
जळगावात आले २४०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५...
सांगलीत गूळ ३२०० ते ४०४५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १४...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबांचे दर पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नागपूरला सोयाबीन दरात सुधारण्याचा अंदाजनागपूर : बाजारात उशिरा येणाऱ्या सोयाबीनची प्रत...
पुण्यात भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट;...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये अंजीर ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वाटाण्याला २००० ते ३००० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
खानदेशात लाल कांद्याची आवक वाढलीजळगाव : खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...