Agriculture news in marathi Increase in prices of green chillies, cabbage, sugarcane | Agrowon

हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.७) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाची सुमारे ७० ट्रक आवक झाली. विविध भाजीपाल्याची आवक मंदावल्याने बटाटा, हिरवी मिरची, सिमला मिरची, कोबी, शेवगा, गाजर, मटार आदींच्या दरात वाढ झाली.

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.७) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाची सुमारे ७० ट्रक आवक झाली. विविध भाजीपाल्याची आवक मंदावल्याने बटाटा, हिरवी मिरची, सिमला मिरची, कोबी, शेवगा, गाजर, मटार आदींच्या दरात वाढ झाली होती. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.

परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ८ टेम्पो हिरवी मिरची, तमिळनाडू येथून अवघा १ टेम्पो शेवगा, गुजरात येथून १ टेम्पो भुईमूग शेंगा, तर मध्यप्रदेशातून लसणाची ८ ट्रक आवक झाली होती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० पोत्यांची आवक झाली. फ्लॉवर ८ टेम्पो, कोबी आणि सिमला मिरची प्रत्येकी ५ टेम्पो, गाजर २ टेम्पो,  स्थानिक मटार १०० गोणी, टोमॅटो ५ हजार क्रेट, तांबडा भोपळा ८ टेम्पो,  तर जुन्या आणि नव्या कांद्याची सुमारे ३० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ३० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 

कांदा : जुना - २००-३२०, नवीन - १००-२५०, बटाटा : १६०-२००, लसूण : २५०-७५०, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : ३००-३५०, गवार : गावरान - ५००-६००, टोमॅटो : ३००-४००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३००-५५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २५०-३००, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २८०-३००, पांढरी २००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : ३५०-४००, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : १००-२००, वांगी : ३००-३५०, डिंगरी : ३००-३५०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : ७००-८००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : ९००, गाजर : ३००- ३५० वालवर : ४००-४५०, बीट : २००-२५०, घेवडा : ५००-५५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, पावटा : ५००-६००, भुईमूग शेंग : ३५०-४५०, मटार - १६००-१८००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण :१८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्याचे शेकड्याचे दर 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे एक लाख २० हजार, तर मेथीच्या ५० हजार जुड्या आवक झाली होती. 

कोथिंबीर - ७००-१०००, मेथी -१२००-१७००, शेपू १०००-१२००, कांदापात १५००-२०००, चाकवत -८००-१०००, करडई ५००-८००, पुदिना २००-३००, अंबाडी - ८००-१०००, मुळे - १२००-१६००, राजगिरा - ५००-८००, चुका ८००-१०००, चवळई - १०००-१२००, पालक ८००-१०००. 

फळबाजारात रविवारी लिंबाची सुमारे दीड हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ३० टन, मोसंबी ६० टन, संत्री १० टन, पपई १० टेम्पो, चिक्कू ५०० गोणी, पेरूची सुमारे ५०० क्रेट, सीताफळ ३ टन, कलिंगड ५ तर खरबूज २ टेम्पो, अंजीर दीड टन, विविध बोरांची सुमारे २०० गोणी आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : २००-४००, मोसंबी : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन) : ४० -१५०, संत्रा : (१०किलो) : १००-६००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१३०, गणेश : १०-४०, आरक्ता १०-६०. कलिंगड : ५-२० खरबूज : १०-३० पपई : ३-१५, चिकू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो): ३००-५००, सीताफळ १०-८०, बोरे (प्रति १० किलोचे दर) -चेकनट ४००-६००, चण्यामण्या ५००-६००, उमराण ४०-६०, चमेली १५०-१८०.  भाऊबिजेच्या दुसऱ्या दिवशी परंपरेने फुलबाजार बंद राहिला.

मटण-मासळी

गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. ७) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीची सुमारे २०० किलो, तर नदीच्या मासळीची एक टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे २० टन आवक झाली होती. अशी  माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

दिवाळी संपल्यानंतर अनेक कुटुंबे मांसाहार सुरू करतात. तर भाऊबिजेला देखील मागणी असल्याने मटण, चिकन, मासळीच्या मागणीत वाढ झाली होती. परिणामी पापलेट, कोळंबी, हलवा, रावसच्या दारात १० ते २० टक्के वाढ झाली होती. बोकडांचा तुटवडा निर्माण झाल्याने मटणच्या दारात किलोमागे २० रुपयांनी वाढ झाली होती. मागणी वाढल्याने इंग्लिश अंड्यांच्या शेकडा दरात ३५ रुपयांनी वाढ झाली.  पुरवठा सुरळीत असल्याने गावरान अंडी आणि चिकनचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते, असे अंड्याचे घाऊक व्यापारी रूपेश परदेशी यांनी सांगितले.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) 

  पापलेट : कापरी : १४००-१६००  मोठे -१२००-१४०० मध्यम : ९००-१०००, लहान ७००-८००, भिला : ६००-७००, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ३६०-६५०, रावस : लहान ४८०,  मोठा : ७५०, घोळ : ५५०  करली : २४०, पाला : ५५०-१२००,   वाम : पिवळी : ३६०-६००, काळी :१२०-३६०, करंदी १२०-१६०, ओले बोंबील : १२०-१६०.  

  कोळंबी : लहान १८०-२८०,  मोठी-३६०-५५०, जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ७५०,  लॉबस्टर : १४००-१५००, मोरी : २४०, खेकडे  : २४०-३२० चिंबोऱ्या : ४००-५५०, मांदेली-१००-१४०, राणीमासा-१६०-२००. 
  खाडीची मासळी : सौंदाळे-२००, खापी-२००-२४०, नगली : २००-२८०, तांबोशी : ३२०-४००, पालू- २००-२८०, बांगडा : लहान-१६०-२००, बांगडा मोठा- २००-२४०,  शेवटे २४०. तिसऱ्या: २४० , खुबे : १००-१२०, लेपा-१६०-२४०, शेवटे- २४०, पेडवी-१००, वेळुंजी-१२०-१६०, तारली- १६०. 
  नदीतील मासळी : रहू-१२०-१६०, कतला-१२०-१६०, मरळ-४००-४८०, शिवडा-२४०, खवली-२४०, आम्ळी-१६०, खेकडे-२००, वाम-४८०. 
  मटण- बोकडाचे ७००, बोलाईचे ७००, खिमा-७००, कलेजी-७४०. 
  चिकन २२०, लेगपीस-२७०, जिवंत कोंबडी-१६०, बोनलेस-३२०. 
  अंडी : गावरान शेकडा ९२०, डझन १२०, प्रतिनगास १०. इंग्लिश अंडी- शेकडा ४९५, डझन ७२, प्रतिनग ६.००.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...