Agriculture news in Marathi Increase in prices of leafy vegetables in Pune | Agrowon

पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 जून 2021

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २७) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाच्या सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. खरिपातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरू झाल्याने हंगामातील सर्वाधिक आवक झाली होती.

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २७) राज्यासह परराज्यांतून विविध शेतीमालाच्या सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. खरिपातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरू झाल्याने हंगामातील सर्वाधिक आवक झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून रविवारची भाजीपाल्याची आवक ७० ते ८० ट्रक होती. ती आज वाढली होती. तर पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती.

आवकेमध्ये परराज्यांतून हिमाचल प्रदेशातून ४ ट्रक मटार, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ४ ट्रक, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, आंध्र प्रदेशातून पावटा १ टेम्पो, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ टेम्पो आणि घेवडा १ टेम्पो, तर मध्य प्रदेशातून लसणाची १० ट्रक आवक झाली होती. 

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० पोती आवक झाली होती. तर भेंडी आणि गवार प्रत्येकी ८ टेम्पो, कोबी १० तर फ्लॉ वर ५ टेम्पो, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, टोमॅटो ७ हजार क्रेट, भुईमूग शेंगा १५० गोणी, गावरान कैरी २ टेम्पो, तर कांदा ६० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून ३० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : १५०-२२०, बटाटा : १००-१५०, लसूण : ४००-११००, आले : सातारी १००-२००, भेंडी : २००-२५०, गवार : ३००-४००, टोमॅटो : ५०-१००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२२०, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी २००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १२०-१३०, कोबी : १३०-१५०, वांगी : ३००-४००, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-४००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : ५००-६००, गाजर : २००- २२० वालवर : ३००-३५०, बीट : ८०-१२०, घेवडा : ८००-१०००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : २००-२५०, पावटा : ५००-६००, भुईमूग शेंग : २५०-३५०, मटार - ६००-८००, तांबडा भोपळा : १००-१२०, सुरण : २००-२२०, तोतापुरी कैरी - १६०-२००, गावरान - १००-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या दीड लाख, तर मेथीच्या ५० हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबीर - ६००-१२००, मेथी -१५००-२०००, शेपू ६००-१०००, कांदापात १३००-१८००, चाकवत -७००-८००, करडई ६००-८००, पुदिना २००-४००, अंबाडी - ३००-६००, मुळे - १०००-१५००, राजगिरा - ३००-५००, चुका ५००-८००, चवळई - ३००-४००, पालक ६००-८००. 

फळबाजार 
फळ बाजारात रविवारी (ता. २७) लिंबाची सुमारे ३ हजार गोणी, डाळिंबाची ४० टन, मोसंबी १० टन, संत्रा १ टन, पपई ७ टेम्पो, चिकू ३०० गोणी, पेरू ५० क्रेट, कलिंगड आणि खरबूज प्रत्येकी २ टेम्पो, सीताफळ ६ टन आवक झाली 
होती. लिंबे (गोण) - ६०-१७०, डाळिंब (प्रति किलो) गणेश - ५-२०, आरक्ता -१०-४०, भगवा -२०-८०, मोसंबी (३ डझन) १२०-४०० (४ डझन) ७०-१५०, मोसंबी (१० किलो) ४००-१२००, पपई (किलो) ८-१५, कलिंगड -५-७, खरबूज -१०-२१, सीताफळ - २०-२००, पेरू (२० किलो) - २५०-३००.

फुलबाजार 
ढगाळ वातावरणामुळे गारठा निर्माण झाल्याने गुलछडीच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, घाऊक फुलबाजारात गुलछडीची आवक रोडावली आहे. संकष्ट चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून मागणी चांगली राहिल्याने गुलछडीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली होती. पावसामुळे फुलबाजारात ओली फुले दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारात सर्व प्रकारच्या फुलांची साधारण आवक होत असून, दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. ओल्या मालापेक्षा सुक्या फुलांना जास्त दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-४०, गुलछडी : ५०-८०, ॲस्टर  (५ जुड्या) ः १०-२५, सुटा ८०-१२०, कापरी : २०-४०, शेवंती : ६०-८०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, जरबेरा : ३०-५०, कार्नेशियन : ८०- १३०, शेवंती काडी १००-१५०, लिलीयम (१० काड्या) ६००-८००, ऑर्चिड १००-२००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ३०-४०, मोगरा २००-२५०.

मटण-मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २७) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ टन, नदीच्या मासळीची सुमारे दोन टन आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ टन आवक झाली होती. तर कोरोनाची पुन्हा टाळेबंदीची परिस्थिती, मागील आठवड्यात असलेली वटपौर्णिमा रविवार (ता. २७) संकष्ट चतुर्थीमुळे चिकन, मटण आणि अंडीला मागणी कमी होती. परिणामी, मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) 
 पापलेट : कापरी : १२००-१४०० मोठे १४००, मध्यम : १०००, लहान ७००-८००, भिला : ५००-६००, हलवा : ८००-९००, सुरमई : लहान ६००-९००, मोठे १०००-१२००, रावस : लहान ८००-९००, मोठा : ९००-१२००, घोळ : ८००-९००, करली : ४४०-४८०, पाला : १२००-१४००, वाम : पिवळी ८००-९००, काळी ४००-६०० ओले बोंबील : १८०-२४०. 

कोळंबी  
लहान २८०-३२०, मोठे ४००-४८०, जंबो प्रॉन्स : १०००-१२०० किंग प्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १०००-१२००, मोरी : २००-३६०.

नदीची मासळी 
रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ४००-४८०, शिवडा : २००-२८०, खवली : २००-२४०, आम्ळी : १६०, खेकडे : २४०, वाम : ५५०-६००. 

चिकन 
चिकन : २००, लेगपीस : २४० जिवंत कोंबडी : १७०, बोनलेस : २९०. 

अंडी : गावरान : शेकडा : ८९० डझन : १२० प्रति नग : १०, इंग्लिश : शेकडा : ५६० डझन : ७२ प्रतिनग : ६.

मटण 
बोकडाचे : ७०० बोल्हाईचे : ७०० खिमा : ७००, कलेजी : ७४०.
 


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात उडीद, मुगाला उठाव, दरही तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
शेतमाल आवक वाढली, मागणी घटली, दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...