कात्रजची गाय, म्हशीच्या दूध खरेदी दरात एक आणि दोन रुपयांनी वाढ

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज) एक जानेवारीपासून म्हशीच्या दूध खरेदीत दोन रुपयांनी, तर गायीच्या दुधात एक रुपयाने वाढ केली आहे. एक जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. संघाच्या ६१ व्या आॅनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
Increase in purchase price of Katraj cow, buffalo milk by one and two rupees
Increase in purchase price of Katraj cow, buffalo milk by one and two rupees

पुणे ः जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज) एक जानेवारीपासून म्हशीच्या दूध खरेदीत दोन रुपयांनी, तर गायीच्या दुधात एक रुपयाने वाढ केली आहे. एक जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. संघाच्या ६१ व्या आॅनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.  

वार्षिक सर्वसाधारण सभेतील झालेल्या निर्णयाची माहिती संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी दिली. श्री. हिंगे म्हणाले, ‘‘संघास २०१९-२० या आर्थिक वर्षात दोन कोटी ४८ लाख ८५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर एक रुपयाप्रमाणे सुमारे ६ कोटी ९४ लाख रुपये दोन टप्प्यांत देण्यात येणार असून, प्रति लिटर ५० पैसे प्रमाणे होणारी रक्कम दिवाळीपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. उर्वरित रक्कम मार्च २०२१ पूर्वी देण्यात येणार आहे.’’

गेल्या आर्थिक वर्षात दूध उत्पादक, संस्था प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांना दुग्धव्यवसायातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी संघामध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. संघाने एफएसएआय यांच्यासोबत फोसटॅक (फूड सेफ्टी ट्रेनिंग ॲण्ड सर्टिफिकेशन) ट्रेनिंग पार्टनरशिप घेतली. कोंढापुरी येथे पशुखाद्य कारखाना उभारण्याचे कामकाज पूर्णत्वास आणले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com