Agriculture news in marathi Increase in Rabbi area in Nagpur district | Agrowon

नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात वाढ

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच नुकसान केले. मात्र, हा पाऊस रब्बी हंगामाला पोषक ठरणारा आहे. जिल्ह्यात रब्बीच्या लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला. आजवर जिल्ह्यात रब्बीची नियोजित क्षेत्राच्या ९६ टक्‍क्‍यांवर पेरणी झाली. 

नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच नुकसान केले. मात्र, हा पाऊस रब्बी हंगामाला पोषक ठरणारा आहे. जिल्ह्यात रब्बीच्या लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला. आजवर जिल्ह्यात रब्बीची नियोजित क्षेत्राच्या ९६ टक्‍क्‍यांवर पेरणी झाली. 

गत चार वर्षांपासून जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नव्हती. त्याचा थेट परिणाम रब्बी पेरणी क्षेत्रावर झाला होता. यंदा मात्र पावसाने अखेरच्या क्षणी सरासरी पार केल्याने जमिनीत ओलावा कायम आहे. त्याचा फायदा रब्बी पिकांना झाला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, मका, मिरची, भाजीपाला आदी प्रमुख पिके घेतली जातात. रब्बीचे जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ७३ हजार ५४७ हेक्‍टर इतके आहे.

गतवर्षी जिल्ह्यात रब्बीमध्ये सर्वसाधारण क्षेत्राच्या ८६ टक्के म्हणजे १ लाख ४८ हजार ३२७ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा कृषी विभागाने रब्बीसाठी सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा २ हजार ४५३ हेक्‍टर अधिकचे म्हणजेच १ लाख ७६ हजार हेक्‍टरचे पेरणीचे नियोजन केले आहे. यंदा रब्बी हंगामात गव्हाचे ७५ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. तर आजवर गव्हाची जिल्ह्यात ७७ हजार २२० हेक्‍टरवर म्हणजेच नियोजित क्षेत्राच्या २ हजार हेक्‍टरवर अधिक पेरणी झाली आहे.

हरभऱ्याचे ८५ हजार हेक्‍टरवर लागवड क्षेत्र असून, आजवर ७९ हजार ९० हेक्‍टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्या खालोखाल लाखोळीचे २ हजार हेक्‍टरवर आहे. मका १ हजार हेक्‍टर, जवस ५०० हेक्‍टर, तीळ १०० हेक्‍टर, सूर्यफूल १ हजार हेक्‍टर, मोहरी ३०० हेक्‍टर, मिरची २ हजार हेक्‍टर व भाजीपाला ८ हजार हेक्‍टरवर नियोजन आहे. यापैकी आज घडीला १ लाख ७४ हजार हेक्‍टरवर म्हणजेच ९६ टक्‍क्‍यांवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 

पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्‍टरमध्ये) 
गहू ७७२२०, हरभरा ७९०९०, ज्वारी ६८०, मका ८१८, मोहरी १०३, मिरची २४, भाजीपाला ७८२०.
 


इतर ताज्या घडामोडी
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...