नाशिकमध्ये रब्बीत मका, गव्हाच्या पेरणी क्षेत्रात वाढ

चालु वर्षी परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर गेल्या होत्या. त्यामुळे पेरण्यांनी वेग उशिरा घेतल्याचे दिसून आले. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १२ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख १२ हजार ७१४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
Increase in Rabi maize and wheat sowing area in Nashik
Increase in Rabi maize and wheat sowing area in Nashik

नाशिक : चालु वर्षी परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर गेल्या होत्या. त्यामुळे पेरण्यांनी वेग उशिरा घेतल्याचे दिसून आले. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १२ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख १२ हजार ७१४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी ९९.४३ टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली.

जिल्ह्यात पीकनिहाय गहू, हरभरा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक असते. मात्र, चालू वर्षी गहू पेरण्यांनी चालू महिन्याच्या मध्यात गती घेतली.तर मात्र त्या तुलनेत हरभरा क्षेत्र वाढेल, असे चित्र असताना, पेरण्या कमी झाल्याचे स्थिती आहे. जिल्ह्यात गहू व हरभरा ही रब्बी हंगामातील प्रमुख पिके आहेत. त्याचा आढावा घेतल्यास चालू वर्षी गहू क्षेत्राच्या प्रस्तावित पेरण्यांच्या तुलनेत क्षेत्र वाढले आहे. तर हरभरा पिकांमध्येही प्रस्तावित क्षेत्रावर पेरण्या होऊ शकलेले नाहीत.मागील वर्षाच्या तुलनेत हे ४३६९ हेक्टरने क्षेत्र घटले आहे. ज्वारीचे क्षेत्रही चालू वर्षी १५४१ हेक्टरवर कमीच आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर पेरा गव्हाचा आहे. त्यामध्ये सर्वाधिक पेरणी मालेगाव, बागलाण, नांदगाव, पेठ, सिन्नर, येवला व देवळा तालुक्यात आहे. तर गहू प्रस्तावित क्षेत्र अधिक असूनही गव्हाचे क्षेत्र निफाड तालुक्यात घट असल्याची स्थिती आहे. तर चालू वर्षी रब्बी हंगामातील मका पेरण्या प्रस्तावित क्षेत्रावर पूर्ण झाल्याची स्थिती आहे. सर्वाधिक क्षेत्र मालेगाव, बागलाण, नांदगाव, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला व चांदवड तालुक्यात आहे.

हरभरा पेरण्या सटाणा, मालेगाव, नांदगाव,दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक आहेत. तर इतर तालुक्यामध्ये या पेरण्या पूर्ण झाल्या नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढल्याचे  चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर तेलबियांचे क्षेत्र संपुष्टात आल्याचे चित्र आहे. मागील वर्षी २०१९-२० च्या रब्बी हंगामात मक्याचे प्रस्तावित क्षेत्र २५१६ हेक्टर होते. तर असे असताना ७५५१ क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. तर चालू वर्षी क्षेत्र वाढून ४०७७.७५ हेक्टर होते. चालू वर्षी प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत पेरण्या वाढल्या असून ६६२४ हेक्टरवर वाढ झाली आहेत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com