Increase tests to diagnose corona infection
Increase tests to diagnose corona infection

कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या वाढवा :डॉ. राजेंद्र शिंगणे

प्रशासनाने कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात याव्यात.चाचण्यांच्या सुविधा वाढवून तातडीने चाचणीचे अहवाल मिळतील, अशी व्यवस्था करावी.

बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या लाटेत संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात याव्यात. चाचण्यांच्या सुविधा वाढवून तातडीने चाचणीचे अहवाल मिळतील, अशी व्यवस्था करावी,’’ अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीत ते बोलत होते.  उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक, अनिल माचेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी उपस्थित होते.  जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण व कोविड संसर्ग झालेल्या रुग्णांवर गांभीर्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना करीत डॉ. शिंगणे म्हणाले, ‘‘अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्यास तातडीने पुरवठा करावा. यंत्रणेने ऑक्सिजनचा साठा व पुरवठा, मागणी याबाबत अद्ययावत राहावे. ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची चाचणी घेऊन तपासणी करावी. लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा. जिल्ह्यात १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण वेगाने पूर्ण करावे. त्यासाठी लसींची अधिकची मात्रा ठेवण्यात यावी. तसेच दुसरा डोस आलेल्या नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता दुसरा डोस घ्यावा. रुग्णवाढ लक्षात घेता पर्याप्त औषधसाठा ठेवावा. औषधांची कमतरता पडायला नको.’’  ते पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिस विभागाने कारवाई करून दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करावी. सध्या १७ पीएसए प्लांट, चार एलएमओ प्लांट व ४५ ड्युरा सिलिंडरमधून ९९.९० मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात १५ ते १८ वर्षे वयोगटातील ४९ हजार ६१५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे,’’ अशी माहिती या वेळी आरोग्य यंत्रणेने दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com