Agriculture news in marathi Increase in tide in the city | Agrowon

नगरला ज्वारीच्या आवकेत वाढ

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात गावरान ज्वारीची आवक वाढू लागली आहे. गेल्या आठवडाभरात गावरान ज्वारीची २६८ क्विंटलची आवक होऊन ज्वारीला अडीच हजार ते चार हजार रुपयांचा दर मिळाला. बाजरीचीही आवक चांगली होत असून, बाजरीची २१९ क्विंटलची आवक होऊन १५३१ ते दोन हजार चारशे रुपयांचा दर मिळाला.

नगर, सोलापूर, मराठवाड्यातील काही भागांतून येथे आवक होत असल्याने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत गावरान ज्वारीची आवक वाढत असते. यावर्षी आठवडाभरापासून काहीशी आवक वाढली असली तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी होत आहे.

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात गावरान ज्वारीची आवक वाढू लागली आहे. गेल्या आठवडाभरात गावरान ज्वारीची २६८ क्विंटलची आवक होऊन ज्वारीला अडीच हजार ते चार हजार रुपयांचा दर मिळाला. बाजरीचीही आवक चांगली होत असून, बाजरीची २१९ क्विंटलची आवक होऊन १५३१ ते दोन हजार चारशे रुपयांचा दर मिळाला.

नगर, सोलापूर, मराठवाड्यातील काही भागांतून येथे आवक होत असल्याने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत गावरान ज्वारीची आवक वाढत असते. यावर्षी आठवडाभरापासून काहीशी आवक वाढली असली तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी होत आहे.

गेल्या आठवडाभरात काबुली चण्याची १४ क्विंटलची आवक होऊन तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपयांचा दर मिळाला. तुरीची २८७ क्विंटलची आवक झाली मात्र तुरीची हमीदरापेक्षा कमी दरानेच खरेदी केली जात आहे. तुरीला प्रतिक्विंटल तीन हजार पाचशे ते चार हजार सहाशे पंचवीस रुपयांचा दर मिळाला. हरभऱ्याची १९८ क्विंटलची आवक होऊन ३२७५ ते तीन हजार चारशे रुपयांचा दर मिळाला. मुगाची ४५ क्विंटलची आवक होऊन सहा हजार शंभर ते सात हजार रुपयांचा दर मिळाला. मक्याची ३५ क्विंटलची आवक होऊन एक हजार नऊशे पन्नास रुपयांचा दर मिळाला. गुळाची ३७६ क्विंटलची आवक होऊन दर हजार नऊशे पन्नास ते चार हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला. लाल मिरचीची आवकही टिकून आहे. 

आठवडाभरात लाल मिरचीची ४१२ क्विंटलची आवक होऊन पाच हजार आठशे वीस ते चौदा हजार चौसष्ट रुपयांचा दर मिळाला. या महिन्यात ज्वारीची आवक वाढेल असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...