agriculture news in marathi Increase the time in Bhusar market for unloading of goods in Solapur | Page 3 ||| Agrowon

सोलापुरात माल उतरण्यासाठी भुसार बाजारात वेळ वाढवावा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भुसार विभागात दुपारी चारपर्यंत माल उतरून घेण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी भुसार व आडत व्यापारी संघाने केली.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भुसार विभागात रोज ५० हून अधिक ट्रक भुसार धान्याची आवक होते. पण सध्या कोरोनामुळे लादलेल्या कडक निर्बंधामुळे सकाळी सात ते अकरा या वेळेतच दुकाने उघडी ठेवावी लागत आहेत. परंतु या वेळेत या वाहनातील धान्याची चढ-उतार होऊ शकत नाही. त्यासाठी दुपारी चारपर्यंत माल उतरून घेण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी भुसार व आडत व्यापारी संघाने केली. 

कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे सकाळी अकरा वाजताच बाजार समितीच्या आवारातील दुकानांसह गोदामे बंद करावी लागतात. बाजार समितीच्या आवारात गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी आल्या की दिवसभर तो उतरून घेण्याची लगबग सुरू असते. खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांकडे पाठवण्यासाठीही ट्रक भरत असतात. सकाळी अकराच्या पुढेही काम सुरू राहिले की, पोलिस येतात. दंड आकारतात. दुबार प्रकार झाला तर दुकाने सील करू म्हणतात. 

वेळेचे बंधन राहिल्यास बाजारात मागणी आणि पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे संघाचे सचिव मोहन कोंकाटी म्हणाले. 

‘लवचिक भूमिका घ्या’

‘‘पुण्यातही असे निर्बंध आहेत. पण तिथे सकाळी सात ते दुपारी चार अशी वेळ प्रशासनाने भुसार बाजाराला दिली आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लवचिक भूमिका घेणे आवश्यक आहे,’’ असेही कोंकाटी म्हणाले.


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...