agriculture news in marathi increase of Useful water in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील उपयुक्त पाण्यात किंचित वाढ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

औरंगाबाद ः मराठवाड्यातील ८७९ मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांसह बंधाऱ्यामधील उपयुक्त पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. ११ जूनअखेर २९ टक्क्यांवरील उपयुक्त पाणी १८ जूनअखेर ३१ टक्क्यांवर पोचले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद ः मराठवाड्यातील ८७९ मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांसह बंधाऱ्यामधील उपयुक्त पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. ११ जूनअखेर २९ टक्क्यांवरील उपयुक्त पाणी १८ जूनअखेर ३१ टक्क्यांवर पोचले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात सुरवातीला अनेक भागात दमदार, जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे काही प्रकल्पांतील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. मात्र पुन्हा एकदा पावसाने ओढ दिली. त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढण्यास खंड पडला आहे.

११ जूनअखेर मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यापाठोपाठ मध्यम ७५ प्रकल्पांत २० टक्के, लघू ७५३ प्रकल्पांत ११ टक्के, तर गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत २६ टक्के व तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २५ बंधाऱ्यांत ६ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक होते. 

१८ जूनअखेर मोठ्या ११ प्रकल्पांत ३९ टक्के , मध्यम ७५ प्रकल्पांत २१ टक्के, लघु ७५३ प्रकल्पांत १२ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ३४ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २५ बंधाऱ्यांत ६.२ टक्के उपयुक्त पाणी होते. ११ जूनअखेरपर्यंत मराठवाड्यातील एका मध्यम प्रकल्पासह ६३ लघू प्रकल्प कोरडेठाक होते. 

२९३ लघू प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली

अठरा जूनअखेरपर्यंत मात्र कोरड्या पडलेल्या लघू प्रकल्पांची संख्या ९ ने घटून ५४ वर आली होती. तर पाणीसाठा जोत्याखाली गेलेल्या प्रकल्पांची संख्या ३ ने घटून ३०६ वर आली होती. १८ जूनअखेर जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांमध्ये मध्यम १३, तर २९३ लघू प्रकल्पांचा समावेश होता, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.


इतर बातम्या
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....