agriculture news in marathi increase of Useful water in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील उपयुक्त पाण्यात किंचित वाढ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

औरंगाबाद ः मराठवाड्यातील ८७९ मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांसह बंधाऱ्यामधील उपयुक्त पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. ११ जूनअखेर २९ टक्क्यांवरील उपयुक्त पाणी १८ जूनअखेर ३१ टक्क्यांवर पोचले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद ः मराठवाड्यातील ८७९ मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांसह बंधाऱ्यामधील उपयुक्त पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. ११ जूनअखेर २९ टक्क्यांवरील उपयुक्त पाणी १८ जूनअखेर ३१ टक्क्यांवर पोचले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

मराठवाड्यात सुरवातीला अनेक भागात दमदार, जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे काही प्रकल्पांतील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. मात्र पुन्हा एकदा पावसाने ओढ दिली. त्यामुळे प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढण्यास खंड पडला आहे.

११ जूनअखेर मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. त्यापाठोपाठ मध्यम ७५ प्रकल्पांत २० टक्के, लघू ७५३ प्रकल्पांत ११ टक्के, तर गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत २६ टक्के व तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २५ बंधाऱ्यांत ६ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक होते. 

१८ जूनअखेर मोठ्या ११ प्रकल्पांत ३९ टक्के , मध्यम ७५ प्रकल्पांत २१ टक्के, लघु ७५३ प्रकल्पांत १२ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ३४ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २५ बंधाऱ्यांत ६.२ टक्के उपयुक्त पाणी होते. ११ जूनअखेरपर्यंत मराठवाड्यातील एका मध्यम प्रकल्पासह ६३ लघू प्रकल्प कोरडेठाक होते. 

२९३ लघू प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली

अठरा जूनअखेरपर्यंत मात्र कोरड्या पडलेल्या लघू प्रकल्पांची संख्या ९ ने घटून ५४ वर आली होती. तर पाणीसाठा जोत्याखाली गेलेल्या प्रकल्पांची संख्या ३ ने घटून ३०६ वर आली होती. १८ जूनअखेर जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांमध्ये मध्यम १३, तर २९३ लघू प्रकल्पांचा समावेश होता, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.


इतर बातम्या
राज्यात हलक्या पावसाची शक्यता पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १६...
सोयाबीनचा उच्चांकी दर मिळतोय अत्यल्प...अकोला ः सध्या बाजारात सोयाबीनला कुठे दहा हजार,...
...तर ‘त्या’ नेत्यास एकरभर जमीन बक्षीस...कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी...
पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर...नगर ः महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी आयुष्‍य...
रब्बी हंगामात होणार ८४८३ शेतीशाळा पुणे ः रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना...
सोयाबीन उत्पादकांनी टार्गेट ठेवूनच...पुणे : मध्य प्रदेशात सोयाबीनची आवक हळूहळू वाढत...
कोल्हापुरात सोयाबीनवर  तांबेऱ्याचा...कोल्हापूर : जिल्ह्यातील सोयाबीनवर तांबेऱ्याचा...
खानदेशात केळी दर स्थिरजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक...
घोटभर पाणी बेतले मायलेकीच्या जिवावरउंडवडी, जि. पुणे :  पिण्यासाठी पाणी काढताना...
हरभरा पीक करणार यंदाही रब्बीचे नेतृत्व पुणे ः राज्यात खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून...
ग्रामसेवकांचे प्रश्न तातडीने सोडविणार ः...अकोला : राज्यातील ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित...
पावसाचा जोर  पुण्यात ओसरला पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने जिल्ह्यात...
बुलडाणा : पीकविम्याचा प्रश्‍न अधांतरीच बुलडाणा : जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदार संघात...
नांदेडमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ७३...नांदेड : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या...
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, खासगी...परभणी ः जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२१) खरीप...
भरपाईचे प्रस्ताव  तत्काळ सादर करा :...अमरावती : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे...
धुळ्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...कापडणे, जि. धुळे : धुळे तालुक्यात मक्यावर अमेरिकन...
लातूर, उस्मानाबादतील सोयाबीनवर...औसा, जि. लातूर : यंदा सोयाबीन पिकावर मोझॅक,...
धुळे : पाच ऑक्टोबरला गट, गणांसाठी मतदानधुळे : निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या १५ गट,...
‘कृषी विद्यापीठाचे बियाणे रब्बीत विकत...औरंगाबाद : ‘‘येत्या रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील...