पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही वाढले

पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही वाढले
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही वाढले

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी नवरात्रीच्या उपवास संपल्यानंतर भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली हाेती. यामुळे लसूण, आले, हिरवी मिरची, पावटा या भाजीपाल्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली हाेती. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर हाेते.

परराज्यातून हाेणाऱ्या आवकेमध्ये हिमाचलप्रदेशातून २ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ५ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, बैंगलोर येथून आले १ टेम्पो आले, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, मध्यप्रदेश आणि गुजरात मधून लसणाची सुमारे ५  हजार गोणी आवक झाली हाेती. तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार २०० पोती, टॉमेटोे सुमारे ६ हजार क्रेट, काेबी आणि फ्लॉवर प्रत्येकी सुमारे १५ टेम्पाे, गवार १० तर भेंडी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ५ टेम्पो, भुईमूग शेंग १५० गोणी, गाजर २५० गाेणी नवी कांदा सुमारे ५० तर जुना कांदा सुमारे १०० ट्रक आणि आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाटा सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा : ८०-१८०, बटाटा : १६०-२३०, लसूण : १५०-२५०, आले : सातारी : ५५०-६५०, बंैगलाेर ६००, भेंडी : २५०-३५० गवार : सुरती- ३००-४००, टोमॅटो : ५०-८०, दोडका : १५०-२०० हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १४०-१८०, काकडी : १००-१४०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १४०-१५०, पापडी : २००-२५०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ५०-८०, कोबी : ४०-८०, वांगी : १००-२०० डिंगरी : १४०-१६०, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : १००-१६०, तोंडली : कळी २००-२२०, जाड : ९०-१००, शेवगा : ३५०-४००, गाजर : १२०-१६०, वालवर : २६०-३००, बीट : ८०-१२०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १५०-१८०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग : ३५०-४५०, पावटा : ४००, मटार : ९००- ९५०, तांबडा भोपळा : ५०-१००, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे २ लाख तर मेथी अवघी सुमारे ३० हजार जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) कोथिंबीर : ३००-८००, मेथी : ७००-१४००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ८००-१२०० चाकवत : ५००-७००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-२५०, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ५००-८००, चवळई : ४००-७००, पालक : ७००-१०००.

फळबाजार फळबाजारात मोसंबी सुमारे ८० टन, संत्री ५० टन, डाळिंब सुमारे २५० टन, पपई २५ टेम्पोे, लिंबे ३ हजार गोणी, चिक्कू ५०० बाॅक्स आणि गाेणी, पेरू ६०० क्रेट, कलिंगड २० टेम्पो, खरबुज १५ टेम्पो, विविध जातींची बोरे सुमारे ४०० गोणी, सिताफळ सुमारे १५ टन आवक झाली हाेती. फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-५००, मोसंबी : (३ डझन) : १००-२२०, (४ डझन ) : ३०-१००, संत्रा : (३ डझन) १००-२५०, (४ डझन) : ३०-१००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१३०, गणेश १०-२५, आरक्ता १०-४०, कलिंगड : ५-१५, खरबुज : १०-२५, पपई : ५-२०, चिक्कू : ३००-६००, पेरू (२० किलो) : ४००-५००, सीताफळ : १०-१२५, सफरचंद सिमला (२५ किलो) १२००-१८००, किन्नोर : (२५ ते २६ किलो) २०००-३०००, काश्मीर डेलीशिअस : (१५-१६ किलो) ८००-१३००, बटरनाक : (१५ ते १६ किलो) १७००-१८००, बोरे : चेकनट (१० किलो) ४५०-५५०, उमराण (१० किलो) ८०-१००, चमेली (१० किलो) १८०-२२०, चण्यामण्या ५५०-६५०.

फुलबाजार फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ५-१५, बिजली : २०-४०, कापरी : २०-५० शेवंती ६०-८०, ऑस्टर : ८-१६, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ५-२०, गुलछडी काडी : १०-७०, डच गुलाब (२० नग) : ३०-६०, लिलिबंडल : ३-६, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-१००.

मटण मासळी नवरात्रोत्सव संपल्याने मासळी, चिकन, अंडी आणि मटणाला मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. मासळीच्या दरात १० ते १५ टक्के, चिकन २० रुपयांनी तर अंड्याच्या दरात प्रतिशेकडा २५ रुपये तर मटणाच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे. गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे १०  टन, खाडीची सुमारे ६०० किलो, नदीची १ टन  आवक झाली हाेती. तर आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १२ टन आवक झाली हाेती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे : १४००-१५००, मध्यम : ७५०-८५०, लहान : ५५०-६५०, भिला : ४८०, हलवा : ४४०-४८०, सुरमई : ४८०-५५०, रावस-लहान : ४४०-५२०, मोठे ६५०, घोळ : ५५०, करली : २४०, करंदी  (सोललेली) : ३२०,  भिंग : २४०, पाला : लहान ६००-७००, मोठे :१२००-१४००, वाम : पिवळी ५५०-६००, काळी : ३२०-४००, ओले बोंबील : लहान ८०,  १२०, कोळंबी ः लहान : ३६०, मोठी : ४८०-५००, जंबोप्रॉन्स : १३००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १२५०, मोरी : २०० मांदेली : १००,  राणीमासा : १६०-२००, खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ४००-४८०, खाडीची मासळी : सौंदाळे : २००, खापी : १६०-२००, नगली : लहान २४०-३६० मोठी ४८०-५५०, तांबोशी : ३६० , पालू : २८०, लेपा : लहान १२०, मोठे २००, शेवटे : २४० बांगडा : लहान १४० मोठा २०० ,पेडवी : ५०, बेळुंजी : १००, तिसऱ्या : १६०, तारली : १००-१२०. नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : लहान २८० मोठी ४०० शिवडा : २४० चिलापी : ६०, मागुर : ९०, खवली : १६०, आम्ळी : ६० खेकडे : १६०, वाम : ४८०. मटण : बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८० कलेजी : ५२०. चिकन : चिकन : १७०, लेगपीस : २००, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २६०. अंडी : गावरान : शेकडा : ७२०, डझन : ९६ प्रति नग : ८. इंग्लिश : शेकडा : ४२५  डझन : ६० प्रतिनग : ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com