Agriculture news in Marathi Increase in vegetable imports due to exposure to rains | Agrowon

पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थोडी उघडीप दिल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली होती.

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाची सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थोडी उघडीप दिल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली होती. मात्र भेंडी, गवार आणि वांग्याची आवक तुलनेने घट झाल्याने दरात १० ते २० टक्के वाढ झाली होती.  

परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ टेम्पो, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून घेवडा ३ तर मध्य प्रदेशातून लसणाची १० ट्रक आवक झाली होती.  

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार १०० पोती आवक झाली होती. तर भेंडी ७, गवार ५ टेम्पो, फ्लॉवर ७ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, सिमला मिरची १० टेम्पो, स्थानिक मटार १ हजार गोणी, तांबडा भोपळा सुमारे ५ टेम्पो, टोमॅटो ७ हजार क्रेट, तर कांदा ६० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदूर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाटा ३० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
कांदा : १५०-१९०, बटाटा : १००-१४०, लसूण : ३००-८००, आले : सातारी १००-२५०, भेंडी : २००-३००, गवार : ३००-४००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१००, कारली : हिरवी १००-१५०, पांढरी १००-१२०, पापडी : २००-२५०, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ८०-१२०, वांगी : २००-३००, डिंगरी : २००-२२०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १००-१६०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : ९०-१००, शेवगा : २००-२५०, गाजर : २२०- २५० वालवर : २५०-३००, बीट : ६०-१००, घेवडा : ४००-४५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २००-२५०, पावटा : २५०-३००, भुईमूग शेंग : ३००-३५०, मटार - ५००-६००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण :१८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्याचे शेकड्याचे दर 
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे एक लाख तर मेथीच्या ४० हजार जुड्या आवक झाली होती. कोथिंबीर - १०००-२०००, मेथी -१०००-१५००, शेपू २००-४००, कांदापात ५००-८००, चाकवत -५००-६००, करडई ३००-५००, पुदिना २००-४००, अंबाडी - ५००-६००, मुळे - ७००-१२००, राजगिरा - ३००-५००, चुका ५००-८००, चवळई - २००-४००, पालक ६००-८००. 

फळबाजारात रविवारी (ता. १) लिंबाची सुमारे ३ हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ४० टन, मोसंबी ५० टन, संत्रा १ टन, पपई १० टेम्पो, चिक्कू १ हजार गोणी  आणि पेरूची सुमारे ५०० बॉक्स आणि क्रेट, सीताफळ १० टन, कलिंगड २ टेम्पो आणि खरबूज २ टेम्पो आवक झाली होती.  

फळांचे भाव पुढीलप्रमाणे 
लिंबे (प्रति गोणी) : ५०-१५०, मोसंबी : (३ डझन) : १००-२००, (४ डझन) : ३० -८०, संत्रा : (१०किलो) : २००-५००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३५-१३०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड: १५-२० खरबूज : २५-३० पपई : १५-२५, चिक्कू (१० किलो) ८०-४००, पेरू (२० किलो): १५०-३५० 

फुलबाजार 
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १६-३०, गुलछडी : १६-२४, अष्टर : जुडी ५-८, सुट्टा २०-४०, कापरी : १०-३०, शेवंती : १०- २०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-१५, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ३०-८०,  जर्बेरा : १०-२०, कार्नेशियन : ५०- १००, शेवंती काडी १५०-१५०, लिलियम (१० काड्या) ५००-७००, ऑर्चिड २५०-४००, ग्लडिओ (१० काड्या) : ५०-८० मोगरा २५०-४००.

मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीच्या मासळीची २०० किलो, नदीच्या मासळीची सुमारे २ टन आवक झाली होती. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ टन आवक झाली होती. दरम्यान मासेमारी बंद असल्याने खाडीच्या मासळीमध्ये सौंदाळे, खापी, लेपा, पालू, पेडवी, तारी बेळुंजी याची आवक झाली नव्हती. तर आषाढ महिन्यामुळे चिकनला मागणी वाढल्याने अंड्याच्या मागणीत घट झाली होती. यामुळे इंग्लिश आणि गावरान अंड्याच्या दरात शेकड्यामागे ३० ते ४० रुपयांची घट झाली 
होती. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे १४००-१५००, मध्यम : १०००-१२००, लहान ९००-१०००, भिला : ७००, हलवा : ७००-९००, सुरमई : ६००-१०००, रावस : लहान ७००-९००, मोठा : १२००, घोळ : ९००, करली : ४००, पाला : १०००-१२००, वाम : पिवळी ८००, काळी ४००. 

कोळंबी ः लहान २८०, मोठी ४००-५५०, जंबोप्रॉन्स : १००० किंगप्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १०००, मोरी : २४०-३६०, खेकडे २४०, चिंबोऱ्या ५५०. 

खाडीची मासळी ः नगली ५५०-६००, तांबोशी ४४०, बांगडा ३२० - ३६०, शेवटे १२०, तिसऱ्या २४०, खुबे १४०

नदीची मासळी : रहू : १००- १६०, कतला : १२०-१६०, मरळ : ४००-४८०, शिवडा : १६०, खवली : २५०, आम्ळी : १५०, खेकडे : २००, वाम : ५२०. 

चिकन : चिकन : २४०, लेगपीस : २८० जिवंत कोंबडी : १९०, बोनलेस : ३४०. 

अंडी : गावरान : शेकडा : ८८० डझन : १२० प्रति नग : १०, इंग्लिश : शेकडा : ४७० डझन : ६६ प्रतिनग : ५.५०. 

मटण : बोकडाचे : ७०० बोल्हाईचे : ७०० खिमा : ७००, कलेजी : ७४०.


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...