Agriculture news in Marathi, Increase in vegetable prices due to inward decline | Agrowon

आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. आले, भेंडी, हिरवी मिरची, वांगी, शेवगा यांची आवक मंदावल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते. 

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची अवघी सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. आले, भेंडी, हिरवी मिरची, वांगी, शेवगा यांची आवक मंदावल्याने दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे ८ टे हिरवी मिरची, हिमाचल प्रदेशातून सुमारे ५ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ५ टेंपो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ३ टेंपो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी, तर इंदूर येथून गाजर सुमारे ६ टेंपो आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टॉमेटो अवघे सुमारे ५ हजार क्रेट, फ्लॉवर सुमारे १० टेंपो, तर कोबी ८ टेंपो, ढोबळी मिरची सुमारे १० टेंपो, तांबडा भोपळा १२ टेंपो, गावरान कैरी सुमारे ८ टेंपो, तसेच कांदा सुमारे ८० ट्रक, तर स्थानिकसह आग्रा, इंदूर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव 
 कांदा ः १००-१५०, बटाटा ः १००-१६०, लसूण - ४००-९००, आले : सातारी - ७००-९००, भेंडी : २५०-३५०, गवार : २००-४००, टोमॅटो ः १६०-२००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ६००-७००, दुधी भोपळा : ८०-१४०, चवळी : १५०-१८०, काकडी : १५०-१८०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी २००-२५०, पापडी : २५० -२८०, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : ८०-१२०, कोबी : १००-१३०, वांगी : २०० -२५०, डिंगरी : १५० -१६०, नवलकोल : १४० -१५०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ४००-४५०, गाजर : १६०-१८० वालवर : ३००-३५०, बीट : १५०-१६०, घेवडा : ५५०-६००, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १८० -२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ३०० -३५०, पावटा : ७०० -७५०, मटार : ६५०-७५०, तांबडा भोपळा ८०-१२०, चिंच अखंड ३००-३५०, सुरण : ३४०-३५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख, तर मेथीची सुमारे अवघी सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली होती. 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १००० -१८००, मेथी : १०००-१५००, शेपू : ५००-१०००, कांदापात : १२०० -१५००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ५०० -६००, पुदिना : ३०० -५००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-
१५००, राजगिरा : ५०० -६००, चुका : ८००-१०००, चवळई : ४०० -६००, पालक : ५०० -७००. 

फळबाजार
रविवारी (ता. १६) मोसंबी सुमारे ३० टन, संत्री ३ टन, डाळिंब २०० टन, पपई २० टेंपो, लिंबे सुमारे अडीच हजार गोणी, चिकू २ हजार डाग, कलिंगड २५ टेंपो, खरबूज १० टेंपो आवक झाली होती. सध्या पुणे जिल्ह्यातील गावरान आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, मावळ मुळशी, भोर वेल्हा, खडकवासला परिसरातून सुमारे २०० हारे (मोठ्या पाट्या) आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे
(प्रतिगोणी) : २००-७००, मोसंबी : (३ डझन) : १८०-३५०, (४ डझन ) : १००-१८०, संत्रा : (३ डझन) : ३००-५००, (डझन ४) : ११०-२५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २५-७५, गणेश ५-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-८, खरबूज : १०-२५, पपई : ३-१०, चिकू : १००-५००, गावरान आंबा - हापूस - १३०-२८०, पायरी ५०-१२०, रायवळ - २०-८०, केशर - १००-१२० (किलो).

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ६०-१००, गुलछडी : ८०-१२०, कापरी : ५०-१००, मोगरा : ५००-७००, ऑस्टर : २५-३५, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २५-५०, डच गुलाब (२० नग) : ७०-१२०, लिली बंडल : ५-७, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : १००-१८०. 
 
गणेश पेठतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १६) खोलसमुद्रातील मासळी सुमारे ४ टन, खाडीची १०० किलो तर नदीची मासळी सुमारे ७०० किलो आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाली होती. दरम्यान पश्चिम किनारपट्टीवरून पावसामुळे मासळीची आवक बंद असल्याने दरात १० ते २० टक्यांनी वाढ झाली होती. तसेच खाडीतून येणारी आवक देखील बंद असून, दमदार पावसाला प्रारंभ झाल्यावर पुढील ५ ते ७ दिवसांत बंगालच्या खाडी वरून मासळीची आवक सुरू होईल तेव्हा भाव कमी होतील, असा अंदाज व्यापारी ठाकूर परदेशी यांनी व्यक्त केला. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत इंग्लिश आणि गावरान अंड्याच्या शेकड्याच्या दरात अनुक्रमे ४५ आणि १० रुपये दर वाढ झाली असून, मटण-चिकन स्थिर असल्याच्या माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १८००-,२०००, मोठे १८००, मध्यम : १३००, लहान १०००, भिला : ७००-८००, हलवा : ८००, सुरमई : ८००-९००, रावस : लहान ७५०, मोठा : १०००, घोळ : ७००,  भिंग : ००, करली करंदी, पाला : लहान ८००, मोठा ०००-०००, वाम : पिवळी लहान ९००  काळी : ४८०, ओले बोंबील : २८०-३२०, कोळंबी ः लहान ३६०, मोठी : ५५० जंबो प्रॉन्स : १६००, किंग प्रॉन्स : १०००, लॉबस्टर : १६००, मोरी : लहान : २८०, मोठी- ०००, मांदेली : १६०, राणीमासा : २८०, खेकडे : ०००, चिंबोऱ्या : ५५०

खाडीची मासळी  
तांबोशी : ५५०, पालू : ०००, लेपा : लहान ३२० बांगडा मोठा -२४०-२८०, तिसऱ्या : २४०, खुबे १६०, तारली : १४०

नदीची मासळी  
रहू : -१६०, कतला : १६०, मरळ : लहान ३६० मोठे- ४८०,, शिवडा : २४०, चिलापी : ६०-८०,  खवली : २४०, आम्ळी : १०० खेकडे : २८०, वाम : ४८०

मटण  
बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५६०

चिकन 
 चिकन : १७०, लेगपीस : २००, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०. 

अंडी : गावरान : शेकडा : ६६०, डझन : ९० प्रतिनग : ७.५ इंग्लिश : शेकडा : ४४५ डझन : ६० प्रतिनग : ५

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...