agriculture news in marathi Increase in vegetable prices in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

कोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात बहुतांशी भाजीपाल्याच्या दरात तेजी कायम राहिली.

कोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात बहुतांशी भाजीपाल्याच्या दरात तेजी कायम राहिली. गेल्या सप्ताहमध्ये सर्वत्र पाऊस झाल्याने भाजीपाल्याची काढणी अनियमित झाली. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची मुबलक आवक झाली नसल्याने दरात वाढ झाली. 

बाजार समितीत टोमॅटोची दररोज २३ हजार क्रेट इतकी आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस सरासरी २२५ रुपये इतका दर मिळाला. ओली मिरचीची सातशे ते आठशे पोती इतकी आवक होती. मिरचीस दहा किलोस सरासरी ४२५ रुपये दर होता. ढोबळी मिरचीची आवक ९०० ते १००० पोती इतकी होती. मिरचीस दहा किलोस ३५० रुपये इतका सरासरी दर होता.

गवारीच्या आवकेत गेल्या सप्ताहात तुलनेत थोडी वाढ होती. गवारीची दररोज तीनशे ते चारशे पोती इतकी आवक झाली. सरासरी पाचशे पन्नास रुपये इतका दर होता. भेंडीची तीनशे ते चारशे करंड्या इतकी आवक होती. भेंडीस दहा किलोस सरासरी साडेतीनशे रुपये इतका दर होता.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची आवक  या सप्ताहात वाढली. कोथिंबिरीची दररोज ४० ते ४२ हजार पेंढ्या इतकी आवक होती. कोथिंबिरीचे शेकडा ७५० रुपये दर होता. इतर पालेभाज्यांमध्ये मेथी पालक पोकळ्यास शेकडा आठशे रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. 

मका कणसांची ९०० ते १००० नग इतकी आवक होती. शेकडा पाचशे रुपये इतका दर होता. ओल्या भुईमूग शेंगांच्या आवकेस सुरवात झाली आहे. दररोज १५ ते २० पोती भुईमूग शेंग बाजार समितीत येत आहे. ओल्या भुईमूग शेंगेस दहा किलोस सरासरी ३०० रुपये इतका दर मिळत आहे.

रताळ्याची आवक नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या सप्ताहात चांगली होत आहे. विशेष करून कोल्हापूरच्या पश्चिम भागातून रताळ्याची आवक वाढली आहे. रताळ्याची दररोज २००० ते ३००० पोती इतकी आवक होत आहे. रताळ्यास दहा किलोस २०० रुपये इतका सरासरी दर मिळत आहे.


इतर बाजारभाव बातम्या
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...
नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक सर्वसाधारण...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मिरचीला दराचा तडकाअकोला ः हिरवी मिरची यंदा संपूर्ण हंगामात चांगल्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवाळी दिवशीही... कोल्हापूर  : जिल्ह्यात यंदा झेंडू...
जळगावात झेंडूच्या बाजारात तेजीजळगाव : झेंडू फुलांची दिवाळीनिमित्त मोठी मागणी...
नाशिकमधील झेंडू उत्पादकांचा थेट...नाशिक : चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेला परतीचा...
नगरमध्ये शेवंतीची फुले चारशे रुपये किलो नगर ः नवरात्रोत्सवात झालेल्या जोरदार पावसामुळे...
औरंगाबादमध्ये झेंडू सरासरी ६५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत पेरू १००० ते कमाल २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला...
राज्यात गवार १५०० ते ७००० रुपये...पुण्यात ५००० ते ७००० रुपये दर पुणे ः...
नाशिकमध्ये डाळिंब ७ हजार ५०० रुपये...नाशिक : ‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...