जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने जनावरांच्या जाती, प्रजाती, आनुवांशिकता, वेत
ताज्या घडामोडी
सिंधुदुर्गात भाजीपाल्याच्या दरात वाढ
सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बेळगाव परिसरातून किरकोळ भाजी विक्रेते जिल्ह्यात दाखल झाले. परंतु, त्यांच्याकडील भाजीपाल्याचे दर मात्र सर्वसामान्य ग्राहकांना न परवडणारे आहेत. सर्वच भाज्या साधारणपणे १०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकल्या जात आहेत. असे असले तरी भाजी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडताना दिसत आहे.

जिल्ह्यात पाच दिवस सतत अतिवृष्टी झाली. या शिवाय जिल्ह्यात भाजीपाला येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, बेळगाव या तीनही जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातले. त्यामुळे तीनही जिल्ह्यांतून येणारा भाजीपाला गेल्या सात आठ दिवसांपासून बंद आहे. ऐन श्रावणात भाजीपाला नसल्यामुळे नागरिकांची मोठी कोंडी झाली आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील जनजीवन अजूनही विस्कळित असल्यामुळे तेथून जिल्ह्यात भाजीपाला येण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. परंतु, दोन दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यातून सिंधुदुर्गात किरकोळ स्वरूपात छोट्या टेम्पोमधून काही निवडक भाज्या विक्रीसाठी येऊ लागल्या आहेत.
यामध्ये विशेषतः मिरची, टोमॅटो, बटाटा, ढोबळी मिरची, भेंडी, गवार आणि कोबी, कोथिंबिरीचा समावेश आहे. भाजीपाल्याचा टेम्पो आल्याचे समजताच ग्राहकांनी भाजी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली. परंतु, भाजीचे दर ऐकल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणीच पळाले. मिरची-१४० रुपये, टॉमेटो, भेंडी, गवार, ढोबळी मिरची सर्व -१०० रुपये, कोथिंबीर पेंडी- ६० ते ८० रुपये, बटाटा-६० रुपये असे भाजीपाल्याचे दर होते. परंतु, तरीही ग्राहकांनी जेथे जेथे भाजीचे टेम्पो गेले तेथे तासाभरात रिकामे केले.
ऐन श्रावणात भाजीपाल्यांची कोंडी झाल्यामुळे नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दरम्यान किराणा दुकानांमधील बटाटा संपला असून त्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती नियत्रंणात येत नाही तोपर्यंत जिल्ह्यात भाजीपाल्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे.
- 1 of 585
- ››