Increase in water level of Godavari
Increase in water level of Godavari

गोदावरीच्या पाणीपातळीत  वाढ

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणांतून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरीची पाणीपातळी वाढली.

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणांतून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरीची पाणीपातळी वाढली. परिणामी, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून बुधवारी (ता.२२) दुपारी ४ वाजेनंतर ३२ हजार क्यूसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला. पाऊस कमी झाल्यानंतर हा विसर्ग कमी करण्यात आला. 

मंगळवार (ता. २१) पासून गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बुधवारी (ता.२२) गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने ९ हजारे क्यूसेकपर्यंत विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला. त्यामुळे नाशिक शहरातील पंचवटी परिसरात रामसेतूच्या कमानीपर्यंत पुराचे पाणी पोचले. त्यानंतर खबरदारी म्हणून प्रशासनाने हा पूल नागरिकांसाठी बंद केला होता. तर येथील व्यावसायिकांना टपऱ्या, साहित्य वाहून नेण्यासाठी लगबग केली होती. पाणीपातळी वाढत गेल्यानंतर दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोचले. त्यामुळे महापालिकेसह पोलिसांनी सुरक्षिततेसाठी सतर्कतेचा इशारा देत गस्त घातली. 

पावसाच्या दमदार पुनरागमनामुळे जिल्ह्यातील एकूण २४ प्रकल्पांत धरणसाठा ८३ टक्क्यांवर पोचला आहे. त्यापैकी गंगापूर धरण समूहातील गंगापूर, आळंदी, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या व माणिकपुंज ही धरणे १०० भरली आहेत.

तर कश्यपी, गौतमी गोदावरी, पालखेड, कडवा, चणकापूर, पुनद ही धरणे जवळपास भरल्या सारखीच आहेत. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या पाणीपातळी १०० दशलक्ष घनफूट झाली आहे.

गंगापूर, दारणा, कडवा धरणात पाणी वाढले 

जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर दारणा, कडवा धरणात पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. पूरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेता बुधवारी (ता.२२) दुपारी ४ वाजेनंतर ३२ हजार ६९२ क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने गुरुवारी (ता.२३) दुपारी १ वाजता विसर्ग १२६२० क्यूसेक इतका सुरू आहे. 

या धरणांतून विसर्ग सुरू (क्यूसेक)

धरण विसर्ग
गंगापूर ३३१८
आळंदी १५०
पालखेड ४३२
वाघाड ५९५
दारणा २७०८
भावली २९०
वालदेवी १८३
कडवा ४२४
चणकापूर २२०
हरणबारी १३४
नाग्यासाक्या ६२६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com