Agriculture news in marathi, Increase in water level in Jalgaon district | Page 4 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

जळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या पावसाने गेल्या शनिवारपासून (ता.१६) झोडपणे सुरू केले. सततच्या पावसाने नद्या, नाले पुन्हा खळाळू लागले आहेत. एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्प या पावसात १०० टक्के भरला.

जळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या पावसाने गेल्या शनिवारपासून (ता.१६) झोडपणे सुरू केले. सततच्या पावसाने नद्या, नाले पुन्हा खळाळू लागले आहेत. एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्प या पावसात १०० टक्के भरला.

जळगाव जिल्ह्यात रविवारी (ता.१७) २४ तासांत जिल्ह्यात ३८.९ मिलिमीटर पाऊस झाला. रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, पारोळा भडगाव व बोदवड तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. अमळनेर तालुक्यात सर्वांत जास्त ६३.७ मिमी, तर चाळीसगाव तालुक्यात सर्वांत कमी ७.८ मिमी पावसाची नोंद आहे.  सोमवारी (ता.१८) व मंगळवारी (ता.१९) पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. 

नदी-नाल्यांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. विसर्ग कमी झालेल्या बहुतांश मध्यम, मोठ्या प्रकल्पांचे दरवाजे उघडून विसर्गात वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांत लावलेल्या दमदार हजेरीमुळे नदी-नाल्यांमधील कमी झालेल्या प्रवाहात वाढ झाली आहे. 

ज्वारी काळी पडली 

अगोदरच अतिपावसामुळे कपाशी, उडीद, मूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात परतीच्या पावसामुळे कापणीस आलेली ज्वारी काळी पडली आहे. एकूणच खरिपातील एकमेव ज्वारी आणि मका उत्पादनाचा हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ऑगस्ट- सप्टेंबरअखेर बाजरीचे उत्पादन कापणी होऊन पडले आहे. तर ज्वारीचे पीक कापणीस आले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे ज्वारीची कणसे काळी पडली आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान सुरूच आहे.


इतर बातम्या
  वखारच्या ऑनलाइन शेतीमाल तारण कर्जात...पुणे : राज्य वखार महामंडळाच्या ऑनलाइन (ब्लॉकचेन)...
हिंगोलीत सोयाबीन दरात सुधारणाहिंगोली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात ज्वारी, गहू,...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२१-...
डाळिंबाच्या सुकर वाटेसाठी गडकरी...जालना : संपूर्ण राज्यात महत्वाचे फळपीक असलेल्या...
अमरावती जिल्ह्याती ‘पीएम किसान’ची ५...अमरावती ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ...
कृष्णाकाठावर मजुरांअभावी ऊस रोपांची लागणभिलवडी, जि. सांगली ः कृष्णाकाठावर उसाच्या कांडी...
कोल्हापूर, सांगलीत ‘कृषिपंप...कोल्हापूर  : गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर व...
वीज पुरवठा सुरळीत  करण्यासाठी इंदापुरात...पुणे ः जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील थकबाकीदार...
खानदेशात पीककर्ज वितरणाला येईना गतीजळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामासाठी पीक...
सोयाबीन दराची घोडदौड सुरूच राहणार पुणे ः तेलबिया आणि खाद्यतेलाच्या दारातील...
पुणे बाजार समितीचा वारणारांना चाप ः गरडपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे,...
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...