मराठवाड्यातील पाणीटंचाईत वाढ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : पावसाने पाठ फिरविल्याने मराठवाड्यात टंचाईचा सामना करणाऱ्या गावे, वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारअखेरपर्यंत (ता. १६) २१४१ गावे, वाड्यांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. त्यासाठी २२६३ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. ५५३० विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

मराठवाड्यात १० जुलैअखेरपर्यंत १९५४ गावे, वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट होते. आता त्यामध्ये आठवडाभरात १८७ गावे, वाड्यांची भर पडली. औरंगाबाद जिल्ह्यातील ५३० गावे, ८९ वाड्यांमधील २६ लाख २० हजार ६२१ लोकांची तहान टॅंकरद्वारे भागविली जात आहे. त्यासाठी ६८९ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील १९७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

जालना जिल्ह्यातील ३०१ गावे, ८२ वाड्यांमधील ६ लाख ५७ हजार ५१३ लोकांसाठी ३६० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. २७१ विहिरीही अधिग्रहित आहेत. परभणी जिल्ह्यात ५५ गावे, १३ वाड्यांमधील १ लाख ७४ हजार ६७७ लोकांसाठी ६८ टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील ४२९ विहिरी अधिग्रहित आहेत. हिंगोली जिल्ह्यातील ३६ गावे, ४ वाड्यांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आहे. तेथील ८२ हजार १७ लोकांची तहान भागविण्यासाठी ५० टॅंकर सुरू आहेत. ४९० विहिरींचे अधिग्रहण करण्याचेही काम सुरू आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ७६ गावे, ६१ वाड्यांमधील १ लाख ९५ हजार १५० लोकांसाठी १३७ टॅंकर सुरू आहेत. ११९० विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील ४२५ गावे, १९८ वाड्यांमधील ९ लाख ४६ हजार ४२८ लोकांसाठी ६३२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शिवाय, ६३७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. लातूर जिल्ह्यातील ८१ गावे व २१ वाड्यांसाठी १०४ टॅंकरच्या फेऱ्याही सुरू आहेत. तसेच, १२५२ विहिरी अधिग्रहित आहेत.

उस्मानाबाद जिल्हा तहानला

उस्मानाबाद जिल्ह्यातील १५८ गावे, ११ वाड्यांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट आहे. येथील ४ लाख १७ हजार ३३८ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. त्यासाठी २२३ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. १०६४ विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. त्याद्वारे टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com